Development works – मलठणमध्ये 1 कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण



|सहकारनामा|

दौंड : मलठण ग्रामपंचायतीमधील जवळपास १ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.यावेळी माजी आमदार रमेशआप्पा थोरात,तालूकाध्यक्ष आप्पासाहेब पवार,पंचायत समिती सदस्या ताराबाई देवकाते,सरपंच हनुमंत कोपनर,उपसरपंच अनिता देवकाते , नवनाथ थोरात, किरण वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.



जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन आजवर मोठ्या प्रमाणात विकास कामे मंजूर करण्यात आम्हांला यश आलेले आहे.केवळ मुख्य रस्तेच नव्हे तर अंतर्गंत रस्ते करण्यावर देखील भर दिलेलाआहे. परंतु दर्जेदार काम करून घेण्याची जबाबदारी मात्र स्थानिक नागरिकांची आहे असे जि.प सदस्य  विरधवल जगदाळे यांनी सांगितले.

ही सर्व कामे करण्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच खासदार सुप्रियाताई सुळे यांचे सहकार्य राहीले आहे तेव्हा आगामी काळात आपणही राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीच्या मागे खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन जगदाळे यांनी केले.