Crime – खडकीतील सूर्या लॉजवर दौंड पोलिसांची धाड, वेश्या व्यवसाय प्रकरणी चौघे अटकेत



|सहकारनामा|

दौंड : लॉक डाऊन मध्ये लॉज व्यवसायास बंदी असताना दौंड मधील लॉजमध्ये मात्र वेश्या व्यवसाय सुरू असल्याची घटना समोर आली आहे, दौंड तालुकातील खडकी येथील सूर्या लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले आहे. दौंड पोलिसांनी या लॉजवर धाड टाकीत वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या चार जणांना अटक केली आहे. सुकेशनी बाबाराव तोतडे (रा. कवडस,नागपूर), प्रकाश शंकरलाल  चैरसिया (रा. देवास,मध्य प्रदेश), सुनील व्यंकटराव जांभगे पाटील (रा. बसवकल्याण, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद), संतोष जयाशील शेट्टी (रा. हसुर, कर्नाटक, सध्या सुर्या लॉज खडकी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

दौंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील खडकी गावातील सूर्या लॉज येथे सदर आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यवसाय चालवीत होते, याची दौंड पोलिसांना खबर मिळताच पोलिसांनी बोगस ग्राहक पाठवून यासंबंधी खात्री करून घेतली व लॉजवर धाड टाकीत वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या चौघांना अटक केली. त्यांच्या विरोधात स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, लॉजवर मिळून आलेल्या मुलीस सुधारगृहात पाठविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेचा  पुढील तपास पो. निरीक्षक नारायण पवार करीत आहेत.