यवतमध्ये बनावट ‘एशियन पेंट’ तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांचा ‘छापा’, छाप्यामध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल ‘जप्त’

पुणे : यवत (ता. दौंड, जि. पुणे) या गावच्या हद्दीमध्ये बनावट एशियन ऑईल पेंट तयार करून ते विक्री करणाऱ्या दुकानावर आणि कारखान्यावर यवत पोलीस आणि कॉपीराईट अधिकाऱ्यांनी छापा मारून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई भुलेश्वर मार्केटमध्ये असणाऱ्या भुलेश्वर पेंन्टस आणि हार्डवेअर या दुकानाच्या मालकावर करण्यात आली आहे.

यवतमध्ये बनावट एशियन पेंट तयार करून त्याची विक्री केली जाते अशी माहिती कॉपी राईट व तपास अधिकारी सुभाष हरिश्चंद्र जैसवाल (रा.गुजरात) यांना मिळाली होती त्यांनी याबाबत यवत पोलिसांना माहिती दिल्यानंतर यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पी.आर. गंपले यांनी जैसवाल आणि आपल्या कर्मचाऱ्यांसह भुलेश्वर पेंट्स, हार्डवेअर या दुकानावर अचानक छापा घातला आणि दुकानाच्या काऊंन्टवर असलेल्या नितिन अशोक जगदाळे (वय 42, व्यवसाय भुलेश्वर पेंन्टस आणि हार्डवेअर दुकान, रा. जगदाळे वस्ती, भरतगाव, ता. दौंड, जि. पुणे) या मालकास ताब्यात घेऊन पंचासमक्ष दुकानात पाहणी केली असता सदर

1)11,600/रु किं Asian Paints Tru Care EXTERIOR WALL PRIMER चे बनावट रंगाने भरलेले 20 Litre प्लस्टिकच्या 4 बकेट प्रत्येकी किमंत 2900/ रूकिं.

2) 12,250 /रू किं Asian Paints Tru Care INTERIOR WALL PRIMER चे बनावट रंगाने भरलेले 20 Litre
येणे प्रमाणे बनावट Asian Paints माल
प्लस्टिकच्या 5 बकेट प्रत्येकी किमंत 2450/ रू. 23,850/-रू चा माल मिळून आला.

त्यानंतर सदर इसमांस नमुद मालाची कागदपत्राची पावती हजर करण्यास सांगितले असता त्याच्याकडे कोणतेही कागदपत्रे
नसल्याचे त्याने सांगितले. दुकानामधील बनावट पेंन्टचा माल कोठे तयार होतो तसेच त्याचे गोडावून कोठे आहे. याबाबत त्याचेकडे विचापुस केल्यानंतर त्याने यवत, ता. दौंड, जि. पुणे गावचे हददीत स्टेशन रोड येथे माझे मालीकीचे भुलेश्वर पेंन्टस नावचे गोडावुन आहे
तेथे हे सर्व तयार होत असल्याचे सांगितले. त्यामुळे सर्व पोलीस स्टाफ, पंच असे सर्वजण नितिन जगदाळे यास सोबत घेवुन सरकारी वाहनाने यवत स्टेशन रोड या ठिकाणी गेल्यानंतर तेथे गोडावुनची पंचासमक्ष पाहणी केल्यानंतर त्या गोडावून मध्ये Asian Paints कंपनीचे वेगवेळ्या प्रकाराचे बनावट 20 Litre प्लस्टिकच्या मोकळ्या बकेट व Asian Paints कंपनीचे बनावट स्टिकर्स खालील प्रमाणे मिळुन आले आहे.

1) 22,400/रू किं Asian Paints Tru Care EXTERIOR WALL PRIMER चे बनावट स्टिकर असलेल्या 20 Litre प्लस्टिकच्या मोकळ्या 32 बकेट प्रत्येकी किमंत 700/रू

2) 7,000/रू किं Asian Paints Tru Care INTERIOR WALL PRIMER चे बनावट स्टिकर असलेल्या 20 Litre प्लस्टिकच्या मोकळ्या 10 बकेट प्रत्येकी किमंत 700/रू.

3) 28,000/रु किं Asian Paints ACE EXTERIOR EMULSION चे बनावट स्टिकर असलेल्या 20 Litre प्लस्टिकच्या मोकळ्या 40 बकेट प्रत्येकी किमंत 700/रू.

4) 20,300/रू किं Asian Paints APEX DUST PROOF चे बनावट स्टिकर असलेल्या 20 Litre
प्लस्टिकच्या मोकळया 29 बकेट प्रत्यकी किमंत 700/रू.

5) 1020/रु किं Asian Paints चे इंग्रजी अक्षरामधील 102 बनावट स्टिकर प्रत्येकी 10 रू किंमत अंदाजे 78,720/- रू येणेप्रमाणे वरील वर्णनाचा सर्व बनावट माल पोलीस उप निरीक्षक पी.आर. गंपले, यांनी दोन पंचासमक्ष जप्त करून त्यावर पोलीस उप निरीक्षक पी. आर. गंपले, व दोन पंच यांचे सहीचे सिले व लेबल जागीच करण्यात आले आहे.

यातील आरोपी नितिन अशोक जगदाळे, (वय 42, व्यवसाय भुलेश्वर पेंन्टस आणि हार्डवेअर दुकान, रा. जगदाळे वस्ती, भरतगाव, ता. दौंड, जि. पुणे) यावर Asian Paints कंपनीचे नावाचा वापर करून मुळ कंपनीच्या परवानगी शिवाय त्याचे भुलेश्वरर पेंन्टस नावाचे गोडावुन मध्ये Asian Paints चे बनावट रंग तयार करून त्याची भुलेश्वर पेंन्टस आणि हार्डवेअर दुकानमध्ये ठेवुन कॉपीराईटच्या स्वामीत्वाचे मुळ हक्काचे उल्लघंन केले असल्याने त्या विरुध्द कॉपी राईट कायदा 1957 चे कलम 51, 63, 65, तसेच भा. द. वि. क 420, 465, 468, 469 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोसइ पी आर गंपले हे अधिक तपास करीत आहेत.