‘हॉटेल कांचन व्हेज’ च्या मालकाला 4 लाख 42 हजारांचा गंडा, बोगस फूड इन्स्पेक्टरला यवत पोलिसांकडून अटक

पुणे

पुणे सोलापूर हायवेवर असणाऱ्या यवत येथील हॉटेल चालकास ४,४२,५०० रुपयांचा गंडा घालणाऱ्या तोतया फुड इन्स्पेक्टरला यवत पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दि.०३/०५/२०२२ रोजी दुपारी १२:३० ते दि.०२/०६/२०२२ रोजी सायं.५:३० वाचे.पर्यत वेळोवेळी यातील हॉटेल मालक प्रसाद दत्तात्रय कांचन यांना मुंबई मंत्रालयातुन फुड इन्स्पेक्टर असल्याचे भासवुन तुमच्या हाॅटेल कांचन व्हेज ची तक्रार माझेकडे आलेली आहे. तुमच्या हाॅटेलमुळे एका महीलेला फुड पाॅयजन झाले आहे म्हणुन तिने माझेकडे तक्रार दिलेली आहे. त्यामुळे आमची टिम तुमचे हाॅटेल सिल करण्यासाठी तुमच्याकडे येत आहे. तुमच्यावर कारवाई करायची नसेल तर तुंम्ही मी सांगतो त्या खात्यावर पैसे जमा करा असे सांगुन सदर हॉटेल मालक प्रसाद दत्तात्रय कांचन यांचेकडून वेळोवेळी एकुण ४,४२,५००/- रूपये ऑनलाईन घेवुन फसवणुक केले बाबत यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयाच्या अनुषंगाने यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सदर गुन्हयचा तपास गुन्हे शोध पथकाचे पोलीस उप निरीक्षक नागरगोजे यांच्याकडे देऊन गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणावयास सांगीतल्याने पोलीस उप निरीक्षक नागरगोजे यांनी तपासाची सूत्रे फिरवून सदरचा आरोपी हा वेगवेगळ्या बोगस मोबाईल नंबर वरून फोन करत असुन तांत्रिक माहितीच्या आधारे ते सोलापूर येथे असल्याबाबत माहिती झाल्याने यवत पोलीस स्टेशन चे गुन्हे शोध पथक यांनी सोलापूर येथे जाऊन आरोपी नामे १) सुरज सुरेश काळे (वय ४० वर्षे रा मधूबन नगर सोलापूर) २) धर्मराज शिवाप्पा शिकलवाडी (वय ३६ वर्षे रा रामवाडी धोंडिबा वस्ती, सोलापूर) हे दोघेही एका ऑनलाइन मनी ट्रान्सफर शॉपवर फिर्यादी यांनी पाठवलेले पैसे नेण्याकरिता आले असता त्यांना तांत्रिक माहितीच्या आधारे तसेच ते रिक्षामध्ये पळून जात असताना त्यांच्या पाठलाग करून अतिशय शिताफीने पकडून जेरबंद केले.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख सो,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक नारायण पवार यवत पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे
पोलीस उप निरीक्षक संजय नागरगोजे,
पो.ना.राम जगताप, पो.कॉ.प्रवीण चौधर, पो.कॉ.मारुती बाराते यांनी केलेली आहे.