|सहकारनामा|
दौंड : संपूर्ण देशातील पेट्रोल, डिझेल व गॅस च्या दर वाढीचा दौंड शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निषेध करण्यात आला. दौंड तहसील कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनावेळी केंद्र शासनाविरोधात घोषणा देण्यात आल्या. पक्षातर्फे तहसीलदारांना इंधन दरवाढी बाबत निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस ची दरवाढ करून देशातील जनतेवर अन्याय करण्याची मालिकाच सुरू ठेवली आहे याचा राष्ट्रवादी काँग्रेस निषेध करीत आहे असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले असून इंधन व गॅसच्या किमती कमी करण्यात याव्यात अशी मागणी ही करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी च्या जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे, ता. अध्यक्ष आप्पासो पवार, शहराध्यक्ष गुरुमुख नारंग, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष सोहेल खान, वैशाली धगाटे, अनिता पवार, विजया शिंदे, प्रशांत धनवे, संदिपान वाघमोडे, दीपक पारदासानी, तुषार कोळी, प्रशांत पवार व नगरसेवक मोहन नारंग आदी उपस्थित होते.