सिद्धू मोसेवाला ‘हत्या’ प्रकरणातील ‘सौरभ महाकाळ’ पुणे ग्रामीण पोलिसांकडून जेरबंद, ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी

सहकारनामा

पुणे : प्रसिद्ध गायक सिद्धू मोसेवाला (sidhu moosewala) याच्या हत्या प्रकरणात फरार असलेल्या सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव या शार्प शुटरपैकी सौरभ महाकाळ याला पकडण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.

पोलीस महाकाळ आणि जाधवचा रात्रंदिवस शोध घेत होते. या शोधमोहिमेत अखेर सौरभ महाकाळ याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या खून प्रकरणात विविध राज्यातील आठ च्या आसपास आरोपी असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव ही पुण्यातील दोन नावे पुढे आल्याने जिल्ह्यात खळबळ माजली होती.

पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ उर्फ महाकाळ याला नारायणगाव मधून अटक करण्यात आली आहे. सिद्धेश कांबळे याच्यावर याआधी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यास अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.