जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कुरकुंभ ‘एम.आय.डी.सी.च्या ‘हार्मोनि ऑरगॅनिक्स’ कडून वृक्षारोपण

दौंड

दि.०५ जून २०२२ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कुरकुंभ एम.आय.डी.सी.मधील हार्मोनि ऑर्गनिक्स प्रा लि.कुरकुंभ या कंपनीच्या माध्यमातून चेअरमन मा.रविकुमार नांगीया साहेब, प्रिसिडेंट मा. आर एल चव्हाण साहेब , व्हा. प्रिसिडेंट मा. सुनील अडप साहेब यांच्या आदेशानुसार व्यवस्थापक मा. दीपक चौधरी साहेबांच्या मार्गदर्शनाने वृक्षारोपणास प्रारंभ करण्यात आला.

यावेळी उपस्थितांनी आपली मनोगते व्यक्त करताना, पृथ्वीतलावर सजीव सृष्टी केवळ वृक्ष, पाणी आणि हवेतील ऑक्सिजनमुळे टिकून आहे. त्यामुळे या सजीव सृष्टी जर पृथ्वीतलावर टिकवून ठेवायची असेल तर वृक्ष लागवड आणि त्याचे संवर्धन ही काळाची गरज आहे. सध्या हवामान बदल आणि वाढती उष्णता ही सर्व सजीवांसाठी पर्यावरणाकडून एक प्रकारे चेतावणी असून त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करणे हाच पृथ्वी वाचविण्याचा एकमेव उपाय असल्याचे मनोगत उपस्थितांनी व्यक्त केले.

त्याप्रसंगीं प्रतिष्ठित नागरिक मा.चंद्रकांत जाधव , मा. दीपक चौधरी साहेब, उत्पादन विभागाचे व्यवस्था पक मा.संजय निकम, उप व्यवस्थापक श्री.निलेश बामणे, अमोल रासकर, संजय इंगळे. इ. स्टोअर विभागाचे उप व्यवस्थापक श्री.जीवन सावंत , उत्तम सूर्यवंशी, अशोक नागरगोजे, मंगेश खुरंगे, निलेश दिवेकर. गुणवत्ता विभागाचे उप व्यवस्थापक श्री. हौशीराम मेरगळ, विनोद फुले, ऋषिकेश कुडेकर, पवन पवार .
इ एच एस विभागाचे उप व्यवस्थापक श्री. आनंद बुरकूल, सुरज चव्हाण, संदेश साखरे आदीनी मोठ्या उत्साहात वृक्ष रुक्ष लागवडीस सुरुवात केली. पर्यावरण आणि सजीव सृष्टीसाठी रक्षणासाठी वृक्षरोपण गरजेचे असून आता कुरकुंभ एम.आय.डी.सी मधील कंपन्याही यासाठी सज्ज झालेल्या पहायला मिळत आहेत.