|सहकारनामा|
दौंड : खोर येथील शेतजमीन आणि ओढ्यातून वाळू काढणाऱ्या 4 जणांवर
यवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या कारवाईत यवत पोलिसांनी 25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांना खोर येथे शेतजमीन आणि ओढ्यातून काहीजण वाळू काढत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी पोलीस पथक व महसूल कर्मचारी पथक तयार करून संबंधित ठिकाणी पाठवले हे असता तेथे काही इसम हे जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू काढत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यावेळी पोलिसांनी फिर्यादी बापु राजाराम देवकाते (वय 55, व्यवसाय-गावकामगार तलाठी खोर रा.दौंड माउली काॅम्पलेक्स दौंड शहर जि.पुणे) यांच्या फिर्यादीवरून आरोपी
1) मोहन गेमु राठोड (वय 32, रा.खिंडीचीवाडी, खोर ता.दौंड जि.पुणे मुळ रा.तिरतांडा ता.गुलबर्गा जि.आळंद )
2) सुधिर चंद्रकांत चैंधरी (वय 40, रा. हरिबाचीवाडी, खोर ता.दौंड जि.पुणे) हे त्यांचा मालक
3) रूपेश दिलीप चैधरी (रा.पाटलाचीवाडी खोर ता.दौंड जि.पुणे) व
4) मारूती केशव चौधरी (रा. पाटलाचीवाडी खोर ता.दौंड जि.पुणे ( जागा मालक ) यांच्यावर भा.द.वि.क 379,34, पर्यावरण संरक्षण अधिनियम 9,15,21,गौण खनिज अधि.21 (4) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
हि घटना खोर गावचे हद्दीत पाटलाचीवाडी, ता.दौंड, जि.पुणे येथे ओढयाचे कडेला मारूती केशव चौधरी यांचे मालकीच्या पिंपळाचीवाडी जमिन गट नं.318 यामध्ये
दि. 04/07/2021रोजी वेळ 13ः00 वाजे सुमारास घडली आहे.
या कारवाईत 1) 15 लाख रूपये किंमतीचा एक पिवळे रंगाचा जे.सी.बी.
2) 10 लाख रूपये किंमतीचा एक निळे रंगाचा न्युहाॅलंड कंपनीचा ट्रॅक्टर ट्राॅलीसह त्यामध्ये 01 ब्रास वाळुसह असा एकूण 25 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हि कारवाई यवत पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली API स्वप्निल लोखंडे, PN शिंदे ,PN बनसोडे, Pc खबाले, PC काळे व तलाठी बापू राजाराम देवकर यांनी केली असून यवत चे पोनि भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सपोनि लोखंडे हे करीत आहेत.