दौंड मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्साहात साजरी

दौंड

मृत्युंजय प्रतिष्ठानच्या वतीने दौंड येथे स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रेमसुख कटारिया, बादशहा शेख, इंद्रजीत जगदाळे या मा. नगराध्यक्षांसह दत्ताजी शिनोलीकर, सुधीर गटणे, राजेंद्र खटी, सचिन कुलथे, प्रकाश भालेराव, सतीश थोरात,अनिल सोनवणे, अश्विन वाघमारे, अर्चना साने, भाऊ सलगर, विवेक गटणे, किरण फराटे ,वैभव कोंडेजकर, संजय बारवकर, बाळा मंत्री आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या महान कार्याचा आढावा घेतला. दत्ताजी शिनोलीकर म्हणाले, सावरकरांना भारतरत्न मिळेपर्यंत मराठी माणसाने स्वस्थ बसू नये. आमदार राहुल कुल यांच्या वतीने प्रेमसुख कटारिया यांनी, नियोजित सावरकर स्मारकाचे काम निधी अभावी रखडू देणार नाही असा शब्द दिला तर पुढील जयंती स्मारकाच्या नूतन वास्तूत करू असे आश्वासन इंद्रजीत जगदाळे यांनी यावेळी दिले. दौंड नगरपालिका तसेच आरोग्य प्रमुख शाहू पाटील व कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले.