दौंड
दौंड तालुका वनपरिक्षेत्रामध्ये सध्या तेथील वृक्षांची चोरट्यापद्धतीने बेसुमार वृक्षतोड होत असून या वृक्षतोड होत असताना येथील अधिकारी आणि कर्मचारी नेमके काय करत असतात असा प्रश्न आता येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
शफिक मुलाणी या निसर्गप्रेमिंनी या गैर कारभाराबाबत आवाज उठवला असून त्यांनी वन परिक्षेत्रामध्ये (वनविभागाच्या जमीनीमध्ये) अनाधिकृत व्यवसायाला कश्या पद्धतीने आले आहे याबाबत मोठा खुलासा केला आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अनाधिकृत व्यवसायकांनी येथील ‘वन’ संपत्तीची रात्र दिवस अक्षरशा लुट चालवली असून हा प्रकार डोळ्यासमोर दिसत असतानाही संबंधीत अधिकारी, कर्मचारी मात्र या प्रकाराकडे अर्थपुर्ण संबंधामुळे डोळेझाक करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या वन परीक्षेत्रात वृक्षांचे दररोज लचके तोडले जात असून या सर्व प्रकाराने येथील निर्सग प्रेमी मात्र चिंता व्यक्त करत आहेत.
वन परिक्षेत्रातील सुरु असलेल्या लुटीकडे अर्थपूर्ण तडजोडीतून कानाडोळा करण्यात येत असून वन क्षेत्रातील वृक्षतोड करून चोरट्यापद्धतीने त्याची वाहतूक करणारी वाहने व वाहन चालक पकडल्यानंतर वाहन चालकांना आर्थिक तडजोडीतून सोडून दिले जात असल्याचा गंभीर आरोप शफिक मुलाणी यांनी केला आहे. या सर्व प्रकाराच्या काही संभाषण ऑडिओ क्लिपही असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता वेगळे वळण लागण्याची आणि यातील मोठा भ्रष्टाचार उघड होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.