दौंड
शिवसेनेची शाखा हेच माझे घर , रात्रंदिन साथ देणारे शिवसैनिक हेच माझे बंधू, समस्या घेवून येणारे नागरिक हेच माझे आप्तेष्ट आणि त्यांच्या समस्यांची सोडवणूक हेच माझे ऐश्वर्य “या विचारधारेने हिंदूहद्सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी आणि शिवसेनेसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे’ हा सिनेमा पाहण्यासाठी दौंड शिवसेनच्या वतीने यवत येथील गुंजन चित्रपटगृहात खास ‘शो’ चे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी चौफुला येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे या गुरु शिष्याच्या जोडीचं स्मरण करून जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी दौंड शिवसेनेच्या वतीने धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना मानवंदना देण्यासाठी सर्व शाखाप्रमुख व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शिवसेना जिंदाबाद, बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, धर्मवीर आनंद दिघे साहेब अमर रहे, आवाज कुणाचा... शिवसेनेचा.. अशा घोषणा देत जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांचे नेतृत्वात दुचाकी,चारचाकी वाहनाचा ताफा शिस्तबद्ध पद्धतीने चौफुला येथील शिवसेना कार्यालयापासून यवत येथील गुंजन चित्रपट गृहापर्यंत मार्गस्थ झाला.
यावेळी दौंड विधानसभा मतदार संघातील सर्व शाखाप्रमुख, उप शाखाप्रमुख व प्रमुख पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.