Breaking News…पाटस येथील 2 युवकांच्या हत्याकांडातील 4 आरोपी LCB कडून जेरबंद



|सहकारनामा|

पुणे : (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील पाटस येथे किरकोळ वादातून रविवारी रात्री दोन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. 



हत्या करून पसार झालेल्या आरोपींना पकडण्यात पुणे ग्रामिण च्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग LCB ला मोठे यश आले असून Lcb ने या हत्याकांडात सामील असणाऱ्या 4 आरोपींना मोठ्या शिताफीने बारामती विमानतळाजवळील जंगलातून अटक केली आहे.

रविवारी रात्री 10 ते 10:30 वाजण्याच्या सुमारास शुभम शितकल आणि गणेश माकर या दोघांची निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. 

हि हत्या संशयित आरोपी मन्या उर्फ महेश भागवत, महेश टुले, युवराज शिंदे आणि माने या चौघांनी केल्याचे समोर आले होते.

या हत्येमध्ये आरोपींनी तलवार आणि दगडांचा वापर केला होता. त्यामुळे मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडले होते.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पुणे ग्रामिण अधीक्षक डॉ. देशमुख यांनी 

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग Lcb चे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट व त्यांच्या टीमला आरोपींना पकडण्याचे आदेश दिले होते. Lcb टीमने पहाटेपासूनच आरोपींवर सापळा रचला होता. वरील चारही आरोपी हे बारामती येथील विमानतळ परिसरातील जंगलात लपले असल्याची माहिती मिळताच संपूर्ण टीमने त्यांना चोहोबाजूंनी वेढत मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे.

आरोपींना पुढील कारवाईसाठी यवत पोलीस स्टेशनचे ताब्यात दिलेले आहे. पुढील अधिक तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील हे करीत आहेत. 

सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख सो., बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक श्री.मिलींद मोहिते सो. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, महेश गायकवाड,  निलेश कदम, दत्ता तांबे, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, अभिजित एकाशिंगे, काशिनाथ राजापुरे यांनी केलेली आहे.