पुणे : संपूर्ण राज्यात गाजलेल्या कुख्यात गुंड आप्पा लोंढे खून प्रकरणातील 6 आरोपिंना आज मकोका न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हि शिक्षा सुनावताना आरोपिंना प्रत्येकी 2 हजार रुपये दंडही ठोठावला आहे. विशेष न्यायाधीश एस. एन. शिरसीकर यांनी हा आदेश दिला.
कुख्यात गुंड आप्पा लोंढे याचा सकाळी मॉर्निग वॉकला जाताना खून करण्यात आला होता. या खुणाने पुणे जिल्ह्यासह, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यात मोठी खळबळ माजली होती. या खून प्रकरणी विशेष सरकारी वकील विकास शाह यांनी 42 साक्षीदार तपासले. पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांचा कबुली जबाब, बॅलेस्टीक तज्ज्ञ डॉ. कुतुबुद्दीन मुलाणी यांची साक्ष आणि शव विच्छेदन अहवाल यात खूप महत्वाचा पुरावा ठरला आहे.
आप्पा लोंढे खून प्रकरणात न्यायालयाने संतोष भिमराव शिंदे (वय 34), निलेश खंडू सोलनकर (वय 30), राजेंद्र विजय गायकवाड (वय 24), आकाश सुनिल महाडीक (वय 20), विष्णू यशवंत जाधव (वय 37), नागेश लक्ष्मण झाडकर (वय 27) या आरोपिंना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सर्व 6 आरोपि खूनाचा कट रचणे, खून करणे या विविध कलमांखाली दोषी आढळल्याने त्यांना न्यायालयाने ही कठोर शिक्षा सुनावली आहे.
28 मे 2015 रोजी आरोपिंनी कट रचून शिंदवणे – उरुळी कांचन रस्त्यावर गोळ्या घालून तसेच धारदार शस्त्राने वार करून आप्पा लोंढे याचा खून केला होता. यात पोलिसांनी 15 आरोपिंवर आरोपपत्र दाखल केले होते ज्यात 9 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या खून खटल्यात मुख्य आरोपी विष्णू जाधव याला शिक्षा झाली मात्र दुसरा आरोपी गोरख कानकाटे हा मात्र पुराव्याअभावी निर्दोष सुटला आहे. गोरख कानकाटे हा सध्या भाऊ लोंढे हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
या खून प्रकरणात विशेष सरकारी वकील विकास शाह यांनी ४२ साक्षीदार तपासले होते त्यामध्ये पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी नोंदविलेला आरोपींचा कबुली जबाब, बॅलेस्टीक तज्ज्ञ डॉ कुतुबुद्दीन मुलाणी यांची साक्ष आणि शव विच्छेदन अहवाल हा महत्त्वाचा ठरला आहे. परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपींना अधिकाधिक शिक्षा ठोठावण्यात यावी असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील शाह यांनी केला. न्यायालयाने तो मान्य केला.