दौंड : दौंड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या च्यावतीने येथील सर्व मशिदीच्या प्रमुखांचा सत्कार करण्यात आला.
सध्या राज्यात मशिदीच्या भोंग्यावरून राजकारण तापले आहे. त्यातच मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशावरून आज दौंड मनसेच्यावतीने शहरातील विठ्ठल मंदिरामध्ये महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे शहरात तणाव निर्माण होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती ,मात्र दौंड शहरातील मशिदीच्या ट्रस्टिंनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पहाटेच्या नमाजासाठी दिली जाणारी अजान भोंगा न वापरता दिली जाणार आहे व उर्वरित चार नमाजाच्या अजान साठी भोंग्याचा वापर करणार असा निर्णय घेतल्याने तणावाच्या वातावरणातील हवाच निघून गेली. मुस्लिम बांधवांनी घेतलेली ही भूमिका दौंड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या या भूमिकेचे येथील मनसेने स्वागत केले व सर्व मुस्लिम बांधवांचा सत्कार करण्याचे ठरविले. त्यामुळे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी मुस्लिम बांधव व मनसे पदाधिकाऱ्यांनी सदर चा चांगला कार्यक्रम पोलीस स्टेशन येथे करावा असा आग्रह केला. साहेबांच्या आग्रहाचा मान ठेवून मनसेचे पदाधिकारी व मशिदीचे ट्रस्टी ,मुस्लीम बांधव पोलीस स्टेशनला आले. यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील मशिदीच्या प्रमुखांचा व मुस्लीम बांधवांचा शाल व गुलाबाचे फुल देऊन सत्कार केला. राज्यामध्ये कोणत्याही विषयावर काहीही होउदे परंतु दौंड मध्ये मात्र आपण सर्वांनी बंधुभावाने रहावयाचे असा निर्णय सर्वांनी एक मताने यावेळी घेतला. मुस्लिम बांधव व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी,पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी शहरातील सामाजिक सलोखा वाढविण्यासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे स्वागत करीत त्यांचा सत्कार केला. पोलीस निरिक्षक विनोद घुगे, मनसेचे पदाधिकारी सचिन कुलथे, प्रतिभा डेंगळे, लता बगाडे, राजेश चातू,नंदकिशोर मंत्री, मंगेश साठे,अझर कुरेशी तसेच आलमगीर मशिदीचे मुख्य विश्वस्त युसुफ इनामदार ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष सोहेल खान, मा.नगराध्यक्ष बादशहा शेख, शहानवाज पठाण,वसीम शेख,चांद शेख व मुस्लीम बांधव उपस्थित होते.
Home Previos News आणि चक्क विरोध करण्याऐवजी मनसे ने केला मुस्लिम बांधवांचा सत्कार, पोलीस निरीक्षक...