|सहकारनामा|
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार सुपरस्टार दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. दिलीपकुमार यांनी वयाच्या 98 व्या वर्षी बुधवारी अखेरचा श्वास घेतला.
वय झाल्याने दिलीपकुमार हे बर्याच वेळा आजारी असायचे, त्यामूळे त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज बुधवारी सकाळी या बॉलिवूडच्या राजाने अखेरचा श्वास घेतला. दिलीपकुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूड आणि देशात शोकांची लाट उसळली असून अनेक दिग्गज त्यांच्यासमोर नतमस्तक होत आहेत.
दिलीपकुमार यांनी बुधवारी सकाळी 7.30 वाजता मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
दिलीपकुमार यांच्या मृत्यूची खातरजमा करत असलेल्या रुग्णालयाच्या डॉ. पार्कर यांनी या वृत्ताची पुष्टी केली आहे.