कुरकुंभ ‘MIDC’ मध्ये 5 कोटी 47 लाखाच्या केमिकलची ‘चोरी’

दौंड : दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतिमध्ये तब्बल 5 कोटी 47 लाख 20 हजार 385 रुपयांच्या केमिकलची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुरकुंभ एम.आय.डी.सी (ता.दौंड जि.पुणे) येथील इटरनिस फाईन केमिकल्स लिमिटेड, प्लॉट नंबर डी/९/१, ९/२, ९ /३,येथील कंपनीचे कॅटॅलिस्ट रूममध्ये जॉनसन मॅथे नावाचे अमेरिकन कंपनीकडुन आलेले २० किलो रोडिअम ऑन अॅल्युमिना नावाचे केमिकल ठेवण्यात आलेले होते. मात्र हे केमिकल सुरक्षित ठेवले असताना दि. २४/१२/२०२० ते दि.०६/०१/२०२२ दरम्यान कंपनीचे कॅटॅलिस्ट रूममधुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने कंपनीचे २० किलो रोडिअम ऑन अॅल्युमिना नावाचे हे केमिकल चोरून नेले असल्याचे आढळून आले आहे. याबाबत विष्णू बाजीराव डुबे यांनी फिर्याद दिली असून
२०किलो रोडिअम ऑन अॅल्युमिना
केमिकलची किंमत सुमारे ५ कोटी ४७ लाख २० हजार ३८५ रूपये इतकी असल्याचे फिर्यादित म्हटले आहे.
सदर चोरीचा तपास दौंड चे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ वाघमारे हे करीत आहेत.