दौंड : जेष्ठ आणि नामांकित वकील अॅड.सुधीरभाऊ पाटसकर यांच्या नेतृत्वाखाली जिरेगाव विका.सहकारी सोसायटी मध्ये श्रीनाथ-बाबा पॅनेलचे सर्व 13 उमेदवार निवडून आले आहेत. श्रीनाथ बाबा सहकार पॅनेल विरुद्ध भैरवनाथ ग्राम विकास पॅनेल अशी लढत येथे पाहायला मिळाली. यात विनायक रणधीर यांची याआधीच बिनविरोध निवड झालेली होती परंतु त्यांचे निधन झाल्याने उरलेल्या 12 जागांकरिता निवडणूक लागलेली होती त्यामध्ये 13-0 असा निवडणुकीचा निकाल लागला.
हि सोसायटी स्थापन झाल्यापासून म्हणजे जवळपास 60 वर्षांनी जिरेगाव सोसायटीची निवडणूक लागली आहे हे विशेष. गेली 25 वर्षांपासून वर्ष अॅड. सुधीर पाटसकर हे या सोसायटीचे अध्यक्ष होते. अॅड.सुधीर पाटसकर यांच्या नेतृत्वाखालील श्रीनाथबाबा पॅलेनला दौंडचे आमदार राहुलदादा कुल व माजी आमदार रमेशअप्पा थोरात यांचे सहकार्य लाभले याबद्दल विजयी उमेदवारांनी दोघांचे आभार मानले.