दौंड : आंबेगाव (केडगाव) ता.दौंड येथील श्री.विठ्ठल विकास विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली असून या निवडणुकी मध्ये बाळासाहेब पायगुडे, मारुती कडू, मोहन गोडावळे, किसन कडू, तानाजी काळभोर, संतोष (कडू) देशमुख, शरद धुमाळ, अरुण निढाळकर, शारदा तळेकर, बबई बेनगुडे, प्रविण मोरे, गणेश चव्हाण हे सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
आज झालेल्या चेअरमन पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे बाळासाहेब पायगुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश पासलकर यांनी दिली आहे. सदर निवडणूक शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेशदादा पासलकर, बाळासाहेब कडू, सखाराम गोडावळे, सुभाष कडू, महेश पायगुडे, सुरेंद्र हाडके, अशोक राऊत, विजय तळेकर, रविंद्र (कडू ) देशमुख, माऊली निढाळकर, बबन बेनगुडे, बबन तळेकर, संदिप कडू , दत्तात्रय कडू, निलेश चव्हाण, भाऊ धुमाळ, पंढरिनाथ पासलकर, सोपान कडू, मनोज देशपांडे, अक्षय काळभोर, बंडा कडू, नानासाहेब मोरे, नामदेव कडू, यशवंत कडू, सुभाष काकडे, यांचे नेत्तृत्वाखाली पार पडली.
सर्व विजयी उमेदवारांचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, चौफुला या ठिकाणी शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख महेशदादा पासलकर यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला व पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.