|सहकारनामा|
दौंड : यवत (ता.दौंड) पोलिस स्टेशन हद्दीमध्ये एका किराणा दुकान आणि बंद खोलीतून अज्ञात चोरट्यांनी सुुमारे 4 लाख 15 हजार रुपयांचा ऐवज चोरी केल्याची घटना घडली आहे. याबाबत राजेंद्र गणपत मलभारे, (वय – 57 वर्षे, व्यवसाय – व्यापार, रा.यवत म्हसोबाचैक, ता.दौंड जि.पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
दिनांक 15/7/2021 रोजी सायं.4ः00 वाचे.नंतर ते ता.16/7/2021 रोजी सकाळी 07ः00 वाचे.पुर्वी. यवत ता.दौंड गांवचे हददीत कदमआळी येथे अज्ञात चोरट्यांनी
1) 120,000/- एक तीन तोळे वजनाचे सोन्याचे मनी मंगळसुत्र त्यात सोन्याचे व काळे मनी असून त्याचे खालील बाजुस सोन्याचा पता असलेला जु.वा.कि.अं.
2) 10,000/- अंदाजे 10 देवाचे चांदीचे शिक्के, काॅईन, कमरेचा छल्ला 7 भार वजनाचे, चांदीचे ब्रेसलेट 7 भार वजनाचे जु.वा.कि.अं.3) 1,50,000/- रोख रक्कम त्यात 500 रूपये दराच्या 120 नोटा, 200 रूपये दराच्या 250 नोटा, 100 रूपये दराच्या 400 नोटा.(न्यु बालाजी सुपर मार्केट दुकानातील) 4) 1,35,000/- रोख रक्कम त्यात 500 रूपये दराच्या 80 नोटा, 200 रूपये दराच्या 150 नोटा, 100 रूपये दराच्या 500 नोटा.(बालाजी सुपर मार्केट दुकानात) असा एकूण 4,15,000/-
रुपयांचा ऐवज आणि रोख रक्कम चोरी केली आहे.
घटना घडल्यानंतर मा धनंजय पाटील सो उपविभागीय अधिकारी सासवड विभाग सासवड, यवत पो नि पाटील सो ,
सपोनि वाबळे यांनी घटनास्थळी भेट दिली.
यावेळी फिर्यादी यांनी यवत ता.दौंड गांवचे हददीत कदमआळी येथील बालाजी सुपर मार्केट किराणा मालाचे दुकानाचे पाठीमागे असलेले लोखंडी ग्रिल गेटचे कुलूप, दुकानाचे दरवाज्याची व बंद खोलीचे दरवाज्याची कडी कोयंडे कोणीतरी कशानेतरी तोडून बंद खोलीत व दोंन्ही दुकानात प्रवेश करून खोलीतील स्टिल डब्यात असलेले सोन्याचे व चांदीचे दागिने व दुकानाचे काउंटर मधील रोख असा एकुण वरील वर्णनाचा 4,15,000/- रूपये किंमतीचा माल चोरून नेला असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना दिली.
घटनेचा तपास सपोनि वाबळे हे करीत असून गुन्हा दाखल करण्याचे काम अंमलदार सहा फौज चव्हाण यांनी पाहिले.