अमेरीका, ब्रिटन फक्त धमक्या देत राहिले आणि रशियाने युक्रेनवर हल्लाही चढवला, आमच्यामध्ये पडाल तर गंभीर परिणाम भोगाल… रशियाचा इतर देशांना गंभीर इशारा

मॉस्को : रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia Ukraine war) सुरु असलेल्या तनावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि ब्रिटन ने रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध केल्यास याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा दिला खरा पण याचे कोणतेच परिणाम रशियावर न होता उलट आज रशियाने थेट युक्रेनवर हल्ला चढवत युद्ध पुकारले आहे. याबाबत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी लष्करी कारवाईची औपचारिक घोषणा करतानाच युक्रेनविरुद्धच्या रशियन कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्यांविरुद्ध गंभीर परिणामांना तयार राहण्याचा इशारा दिला आहे.

त्याचवेळी या घोषणेनंतर संयुक्त राष्ट्राने (UN) ने पुतिन यांना युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. रशियाने आपल्या सैन्याला हल्ले करण्यापासून रोखावे, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. मात्र याचा कोणताही परिणाम रशियावर होत नसून रशियाने युक्रेन च्या तीन मोठ्या शहरांवर हल्ले सुरु केले आहेत. याबाबत AFP न्यूज एजन्सीने ही माहिती प्रसिद्ध केली आहे.

रशियाने लष्करी कारवाई सुरू केल्यानंतर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी देशात ‘मार्शल लॉ’ लागू करण्याची घोषणा केली आहे. आणि युक्रेनमध्ये राहणाऱ्या नागरिकांना त्यांनी घाबरू नका असे आवाहन केले आहे तर

रशियाने युक्रेनच्या हवाई दलाला योग्य पद्धतीने उत्तर मिळेल असे म्हणत त्यासाठी अचूक निशाणा साधणाऱ्या शस्त्रांचा वापर करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमिर झेलेन्स्की यांनी अन्य देशांनी रशियाला हल्ले करण्यापासून रोखले पाहिजे असे आवाहन करतानाच आक्रमण झाल्यास युक्रेन स्वतःचा बचाव करेल आणि त्यामध्ये यशस्वी होईल असे म्हटले आहे.जिंकेल. त्यांच्या ईशाऱ्यानंतर रशियाने कीवमध्ये हल्ला केला असून यात युक्रेनचे लढाऊ विमाने त्यांनी लक्ष केली आहेत.

रशियाने युद्धाची घोषणा करताना राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनच्या सैन्याने आत्मसमर्पण करून घरी जावे असे आवाहन केले आहे. आणि नाटो देशांबाबत बोलताना त्यांनी आम्ही सर्व प्रकारच्या आक्रमनांना आणि त्यावरील परिणामांना तयार असल्याचे म्हणतं जर आमच्यात कोणी ढवळाढवळ केली तर त्याचे परिणाम भोगायला तयार रहावे असा गंभीर इशाराही दिला आहे.

अमेरिकेचा नाराजीचा सूर… रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने याबाबत माहिती देताना, जगाच्या प्रार्थना युक्रेनच्या लोकांसोबत आहेत, जे रशियाच्या लष्करी दलांच्या विनाकारण हल्ल्यांना बळी पडले आहेत त्यांच्यासोबत संपूर्ण जग आहे असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी म्हटले आहे. आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पूर्वनियोजित युद्ध निवडले आहे जे विनाशकारी सिद्ध होईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

भारताचे दोन्ही देशांना आवाहन – भारतानेही सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना दोन्ही उभय देशांनी शांततेच्या मार्गाने बोलणी करून यावर तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.

रशियाच्या हल्ल्याने ब्रिटन खवळला – ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रशियाने केलेल्या हल्ल्याबाबत ट्विट करत युक्रेनमध्ये घडलेल्या भीषण घटनांनी मी थक्क झालो आहे असे म्हटले आहे. पुढच्या टप्प्यांवर चर्चा करण्यासाठी मी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी बोललो आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनवर हा विनाकारण हल्ला करून रक्तपात आणि विनाशाचा मार्ग निवडला आहे. ब्रिटन आणि आमचे मित्र देश यावर निर्णायक उत्तर देतील असा इशारा त्यांनी दिला आहे.