घरफोडी करणाऱ्या 3 सराईत गुन्हेगारांना अटक, 1 लाख 50 हजारांचे दागिने जप्त

पुणे : घरफोडी करणा-या ०३ सराईत गुन्हेगारांना लोणीकाळभोर पोलिसांनी अटक करुन त्यांचेकडुन दिड लाख रुपयांचे ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने जप्त केले आहेत.

लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हददीत दि.०६/०१/२०२१ रोजी रात्रौ.११:०० वा ते सकाळी ०७:०० वा.चे दरम्यान होळकरवाडी गावचे हददीत यल्लाप्पा कलाप्पा सन्नके (सध्या रा.होळकरवाडी ता.हवेली जि.पुणे मुळ रा.सोलापुर) हे त्यांचे होळकरवाडी येथील रहाते घरास कुलुप लावुन गावी गेले
असता कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांचे घराचा कडी कोयंडा तोडुन आत प्रवेश करुन घरातील एकुण ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने घरफोडी करुन चोरुन नेले होते.

सदर गुन्हयाचा समांतर तपास करणेबाबत मा.राजेंद्र मोकाशी (वरीष्ठ पोलीस निरीक्षक) यांनी तपास पथकास आदेश दिले होते. त्यानुसार तपास पथक प्रमुख सपोनि राजु महानोर व पोलीस अंमलदार सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार नितीन गायकवाड व सुनिल नागलोत यांना सदरचा गुन्हा सराईत गुन्हेगार शाहरुख पवार व त्याचे
भाउ यांनी केला असुन ते वडकी परीसरात आले असल्याचे बातमी मिळाली होती. या माहितीच्या आधारे वपोनि राजेंद्र
मोकाशी यांचे आदेशानुसार सपोनि राजु महानोर व पोलीस अंमलदार यांनी वडकी परीसरात सापळा रचुन सराईत आरोपी १) शाहरुख विजय पवार (वय २७ वर्षे) २) बाज्या विजय पवार (वय २१
वर्षे) ३) देवगुन विजय पवार (वय १९ वर्षे, सर्व रा. माप्तेमळा ता.आटपाडी जि.सांगली) यांना शिताफीने पकडत त्यांचेकडे अधिक तपास केला असता त्यांनी वरील गुन्हा केल्याची कबुल केले आहे. आरोपींकडून गुन्ह्यातील माल ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने किं.रु.१,५०,०००/- (दिड लाख) हा जप्त करण्यात आला आहे. तसेच यातील देवगुन विजय पवार हा यापुर्वी लोणीकाळभोर
पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या दोन घरफोडीच्या गुन्हयात वॉन्टेड आरोपी होता तोही पकडला गेला आहे.

सदरची उल्लेखनीय कामगीरी मा.श्री.नामदेव चव्हाण,अपर पोलीस आयुक्त,पुर्व प्रादेशिक
विभाग,पुणे शहर,मा.नम्रता पाटील,पोलीस उप-आयुक्त,परिमंडळ-५,मा.बजरंग देसाई,सहा.पोलीस आयुक्त,हडपसर विभाग, राजेंद्र मोकाशी, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सुभाष काळे पोलीस निरीक्षक(गुन्हे),लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांचे मार्गदशनाखाली तपास पथकातील अधिकारी सपोनि/राजु महानोर, दिगंबर बिडवे यांचे सोबत पोहवा/नितीन गायकवाड, पोना/सुनिल नागलोत श्रीनाथ जाधव, संभाजी देविकर, दिगंबर साळुके यांच्या पथकाने केली आहे.