नुसता इशाराच नाही, तर यवत पोलिसांची धडक कारवाई सुरू… ‛एन.डी.पी.एस’ कलमाखाली ‛तिघांना अटक’

दौंड : यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील असा इशारा नुकताच सहकारनामा च्या माध्यमातून दिला होता. हा इशारा देतानाच यवत पोलीस कमालीचे सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत असून आज त्यांनी एन.डी.पी.एस.कायद्याअंतर्गत दाखल गुन्हयातील ३ सराईत आरोपींना अटक करून आपला वाचक गुन्हेगारी करणाऱ्या आरोपींवर बसवला असल्याचे सिद्ध केले आहे.

दिनांक २६/१२/२०२१, रोजी १४:३० वाजता चे सुमारास एन.डी.पी.एस कायद्याअंतर्गत यवत पोलीस स्टेशन यांनी मोठी कामगिरी करून यवत पोलीस स्टेशन गु.र.नं १०९५/२०२१, एन.डी.पी.एस. कायदा कलम ८(क), २२(क) अन्वये गुन्हा दाखल केला असुन एकुण १२ आरोपींना अटक करून एकुण ७८,१०,५००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता व पुढील गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक श्री.नारायण पवार हे करीत होते.
सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान आरोपी ०१ ते १२ यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी गांजा विक्री करीत असलेबाबत कबुल केले असुन सदर गांजाचा माल वरील सर्व आरोपी हे मन्सिराम (रा.चिंतापल्ली, नरसिपटणम आंध्रप्रदेश) येथुन आणल्याचे तपासात निष्पन्न झाले होते व ते पुढे गांजाचा माल संतोष देवराम बिलदार व विकास प्रताप मोहिते, (रा.राज मेडीकल शेजारी पिंपरीया, जि.बलसाड, राज्य गुजरात) यांना गांजाची विक्री करणार होते. त्यापैकी मोहन ताराचंद मलकेकर, (रा.भाटनगर, पिंपरी १७पुणे) यास गुन्हयाचे कामी अटक करण्यात आलेली आहे.
सदर गुन्हयातील अटक आरोपींकडे गुन्हयाच्या अनुषंगाने अधिक चौकशी करता
व तांत्रिक विश्लेषना वरून आरोपी संतोष मारूती घुसाळकर, (वय ३५ वर्षे, रा. न्हावरे, ता.शिरूर, जि.पुणे) यास ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा
केल्याचे कबुल केले असुन तो यातील अटक आरोपी यांचेकडुन गांजाचा माल विकत
घेवुन तो पुढे रामदास चंदु सोनवणे, (वय ४२ वर्षे, रा.खडकवासला, ता.हवेली, जि.पुणे)
यास व उफराण उर्फ गुल्फाम सत्तार कुरेशी, (वय २४ वर्षे, रा.लोणावळा,ता.मावळ, जि.
पुणे) यांना विक्री करणार असल्याचे कबुल केले आहे.

यापुर्वीही देखील सदर आरोपींनी वारंवार गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन आरोपी नामे १) संतोष मारूती घुसाळकर, (वय ३५ वर्षे, रा.न्हावरे, ता.शिरूर, जि.पुणे),२) रामदास चंदु सोनवणे, (वय ४२ वर्षे, रा.खडकवासला, ता.हवेली, जि.पुणे) ३) उफराण उर्फ गुल्फाम सत्तार कुरेशी, (वय २४ वर्षे, रा.लोणावळा,ता.मावळ, जि.पुणे,) यांना गुन्हयाचे कामी अटक करण्यात आलेली आहे.