दौंड : जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम जवळ आला असल्याने आता गट रचनेला अनन्य साधारण असे महत्व आले आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस सौ.वैशाली नागवडे यांनीही याबाबत भाष्य केले असून गट रचना ही निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व्हावी आणि त्यामध्ये राजकीय हेतूला थारा मिळू नये असे मत त्यांनी ‛सहकारनामा’ कडे व्यक्त केले आहे.
गट रचना करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उत्तरेकडून पूर्वेकडे असे निर्देश असून नदी, नाले, रस्त्यांबाबाबत असणारे नियम डावलून हेतुपुरस्पर काही गावं एकत्र करण्याचा राजकीय डावही खेळला जात असतो त्यामुळे निवडणूक आयोगाचे निर्देश आणि नियमानुसारच गट रचना व्हावी अन्यथा असे राजकीय डाव आता कोणत्याही परिस्थितीमध्ये उधळून लावले जातील असा गर्भित इशारा वैशाली नागवडे यांनी दिला आहे.
नदी, नाले आणि रस्त्यांबाबत निवडणूक आयोगाचे जे निर्देश आहेत त्यानुसार आता राहू, यवत गटाची रचना करण्यात यावी आणि काही गावे जी निवडणूक आयोगाचे निर्देश डावलून अन्य ठिकाणी जोडली जातात ती निर्देशानुसार योग्य गटात जोडली जावीत असे त्यांनी म्हटले आहे.
गट रचनेनुसार राहू गटातील टाकळी, पानवली ही गावे वर आहे तेथून खाली राहू भाग येतो, मात्र हे होत असताना नदीच्या अलीकडे असणारी गावे ही राहू गटात घेतली गेली होती. त्यामुळे ती गावे यवत गटात न येता राहू गटाला जोडण्याचे नेमके कारण काय होते असा प्रश्नही मागील निवडणुकीवेळी उपस्थित केला गेला होता. त्यामुळे आत्ता पुन्हा निवडणूक आयोगाचे नियम, निर्देश डावलून तसे निर्णय होऊ नयेत अशी अपेक्षाही व्यक्त केली जात असून जर तसा प्रयत्न झाला तर त्याबाबत योग्य त्या ठिकाणी आवाज उठवला जाईल असे मत वैशाली नागवडे यांनी व्यक्त केले आहे.
प्रभाग रचनेची दिशा आणि निर्देश :- प्रभाग रचना सुरु करताना सर्वप्रथम उत्तर दिशेकडून सुरुवात करावी. उत्तरेकडून ईशान्य (उत्तर-पूर्वत्यानंतर पूर्व दिशेकडे येऊन पूर्वेकडून पश्चिमेकडे रचना करत सरकावे व शेवट दक्षिणेत करावा. निवडणूक
प्रभाग रचनेची दिशा आणि निर्देश
विभाग / निर्वाचक गण यांना क्रमांकही त्याच पध्दतीने द्यावेत. मात्र अशी रचना करताना भौगोलिक सलगता राहील, याची काळजी घ्यावी.
निवडणूक विभाग / निर्वाचक गणाच्या सीमारेषा, मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले,
डोंगर, रस्ते, फ्लायओव्हर इत्यादी नैसर्गिक मर्यादा विचारात घेऊन निश्चित
करावी. कोणत्याही परिस्थितीत एका इमारतीचे, चाळीचे, घराचे विभाजन दोन
प्रभागांमध्ये होणार नाही, याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे मोकळया जागांसह सर्व
जागा कोणत्या ना कोणत्या प्रभागात आल्याच पाहिजेत. प्रभाग रचनेच्या बाबतीत
कोणासही शंका घेण्यास वाव राहणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. सीमेचे
वर्णन करताना रस्ते, नाले, नद्या, सिटी सर्व्हे नंबर यांचे उल्लेख प्रामुख्याने यावयास हवे.
प्रभाग रचना करताना लोकसंख्या व प्रभागाची भौगोलिकदृष्टया आटोपशीर व्याप्ती या दोन मुख्य गोष्टी असल्या तरी नागरिकांच्या सामायिक हिताकरिता खालील
बाबी विचारात घ्याव्यात.