पुणे : घरफोड्या चोरी करणारा सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आला आहे. या आरोपिकडून सनसर येथिल घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला असून आणखीन गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
वालचंदनगर पोलिस स्टेशन हद्दीत सनसर येथे काही दिवसांपूर्वी फिर्यादी संभाजी शिवाजी आडके यांच्या घराचे कडी कोयंडा तोडून घरफोडी झाली होती. गुन्ह्याचा तपास करीत असताना सदरची घरफोडी ही नियोजन उर्फ बेरड्या संदीप भोसले (रा. सोनगाव ता. बारामती जि. पुणे) याने केली असून तो सोनगाव बारामती रोडला येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे समजली. त्यावरून त्याठिकाणी सापळा रचून पोलिसांनी बेरड्याला ताब्यात घेत त्याची अंग झडती घेतली असता सदरील घरफोडी मध्ये चोरीस गेलेला एक एम.आय कंपनीचा मोबाईल मिळून आला. त्यावरून आणखीन चौकशी केली असता त्याच्याकडे आणखीन ४ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल मिळून आले. सदरील गुन्हा हा त्याने त्याचा साथीदार लखन पूर्ण नाव पत्ता माहिती नाही सोबत केला असल्याचे सांगितले . त्याचे ताब्यात असलेले मोबाईल आरोपीस पुढील तपास कमी वालचंद नगर पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे .
नियोजन उर्फ बेरड्या संदीप भोसले याच्यावर खालिल गुन्हे दाखल आहेत.
बारामती शहर पोलिस स्टेशन गु र नं १)३५५/२०१३ भा द वि ३७९
२)३५४/२०१९ भा द वि ३८०
३)२२५/ भा द वि ४५४,४५७,३८०
४)४९४/२०२० भा द वि ४५४,४५७,३८०
५)२६१/२०१९ भा द वि ४५७,३८०
६)३७७/२०१९ भा द वि ४५७,३८०
७)३६४/२०२० भा द वि ४५७,३८०
८)११४/२०२० भा द वि ४५४,३८०
सदरील कारवाई ही मा पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते बारामती उपअधिक्षक गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके वालचंद नगर पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी स पो नि लातूरे,पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पो हवा सचिन घाडगे , आसिफ शेख , अजय घुले , विजय कांचन , राजु मोमिन
पो ना अभिजित एकशिंगे ,स्वप्नील अहिवळे पो कॉ धिरज जाधव वालचंद नगर पोलीस स्टेशन चे सहा पोलीस उपनिरीक्षक निकम , पो हवा पाटमास, पो ना स्वामी यांनी केली आहे .