Police beaten in Baramati – बारामतीमध्ये पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! गस्तीचे घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर तिघांचा हल्ला, मारहाण करत गाडीची तोडफोड



पुणे : बारामती तालुक्यातील सुपा येथे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी रात्रीची गस्त घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर तिघांनी जबरी हल्ला करून मारहाण करत पोलिसाच्या गाडीची तोडफोड केल्याची घटना घडली आहे.

शासकीय कर्तव्य बजावत असताना पोलिसांवर बारामती तालुक्यात हा हल्ला होतो आणि हल्ला करणारे आरोपीही बारामती तालुक्यातीलच असल्याने बारामतीमध्ये पोलिसांवर धाक जमविण्याचा प्रयत्न होतोय का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असून बारामती मध्ये आता पोलिसांच्याच सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

या प्रकरणी किसन ताडगे ( पो.कॉ. वडगाव निंबाळकर) यांनी फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात आरोपी रवींद्र छबु आखाडे, विक्रम छबु आखाडे (दोघे रा. बारामती जि.पुणे) सौरभ सूर्यकांत भोसले (रा.माळेगाव, ता.बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार  सुपा पोलीस चौकीचे  पोलीस अंमलदार किसन ताडगे हे सुपा दुरक्षेत्र हद्दीत रात्री गस्तीचे शासकीय कर्तव्य बजावित असताना सुपा-चौफुला

रोडवर शिवप्रसाद हॉटेल पासुन शंभर मीटर अंतरावर रोडवरून तीन  जात असताना दिसले. त्यावेळी पोलीस अंमलदार ताडगे यांनी त्यांना इतक्या तुम्ही कोण आहात, इतक्या रात्रीचे कुठून कुठे चालला आहात याबाबत विचारपूस केली असता यातील आरोपींनी रागाने ताडगे यांना धाक दाखवत धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. तर यातील अन्य आरोपीने त्यांच्या शर्टची कॉलर पकडुन शर्टाची बटणे तोडत

खांदयावरील पटटया व लाईनयार्ड तोडुन

धक्काबुक्की, मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलीस अंमलदार ताडगे हे आरोपींना हे कृत्य करण्यासाठी रोखत असताना एका आरोपीने  त्यांना पाठीमागुन घटट पकडुन दुसऱ्या आरोपीने हातात दगड घेऊन तो ताडगे यांच्या नाकावर मारुन गंभीर जखमी केले.

आरोपी हे एवढ्यावरच न थांबता त्यांनी ताडगे यांच्या गाडीच्या दरवाजावर दोन्ही बाजुनी लाथा आणि दगड मारुन गाडीचे अंदाजे ५० हजार रुपयांचे नुकसान

केले. 

सदर आरोपींवर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोसई शेख हे करीत आहेत.