पुणे : दौंड तालुक्यातील नानविज येथील पोलीस निरीक्षक चंद्रकांत रामभाऊ गुंडगे (पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज) यांना उत्कृष्ट सेवेकरीता ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’ जाहीर करण्यात आले आहे.
आज पोलीस पदकांची आज घोषणा झाली होती त्यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 51 पोलिसांना पुरस्कार जाहीर करण्यात आला असून चार पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’ , सात जणांना ‘पोलीस शौर्य पदक’ तर प्रशंसनीय सेवेकरिता चाळीस जणांना ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहे.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांनी दाखविलेल्या शौर्याबद्दल त्यांना ‘पोलीस पदक’ जाहीर करत असते.
महाराष्ट्रासाठी एकूण ५१ पदक मिळाली असून यात महाराष्ट्रातील चार अधिकारी, कर्मचा-यांमध्ये चंद्रकांत गुंडगे यांचा समावेश आहे.
Home महाराष्ट्र दौंड : नानविज पोलीस प्रशिक्षण केंद्राचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत गुंडगे यांना ‛राष्ट्रपती...