पुणे : सध्या राज्यात गाजत असलेल्या डिसले गुरुजींच्या प्रकरणात आता आरोग्यदूत आमदार राहुल यांनीही उडी घेतली असून त्यांनी डिसले गुरुजींच्या ‛समर्थनार्थ’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र लिहिले आहे.
आमदार राहुल कुल यांनी आपल्या पत्रामध्ये, सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामध्ये कार्यरत असणारे, जागतिक शिक्षक पुरस्काराचे मानकरी श्री. रणजितसिंह डिसले गुरुजी यांना फुलब्राइट संस्थेद्वारे शैक्षणिक क्षेत्रातील संशोधन व पुढील शिक्षणाकरता अमेरिकेतील विद्यापीठामध्ये शिष्यवृत्ती मिळणे हि अतिशय कौतुकाची बाब आहे. परंतु फुलब्राईट स्कॉलरशिपसाठी त्यांचा रजेचा अर्ज नामंजूर केल्याच्या व शिक्षण विभागातल्या काही अधिकाऱ्यांद्वारे त्रास देण्यात येणे हि अत्यंत खेदाची बाब आहे असे म्हटले आहे.
तसेच फुलब्राईट शिष्यवृत्तीच्या माध्यमातून जगातील सर्वोत्तम विद्यापीठात शैक्षणिक संशोधन करण्याची, जागतिक शिक्षणपद्धती जवळून अभ्यासण्याची संधी श्री.रणजितसिंह डिसले गुरुजी यांना मिळणार आहे व भविष्यात या संधीचा वापर ते शासकीय शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थांसाठी नक्कीच करतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
आणि राज्य शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून श्री. रणजितसिंह डिसले गुरुजी यांचा रजेचा अर्जाचा मंजूर करावा, त्यांना पुढील शिक्षणाकरता सर्वोतोपरी सहकार्य करावे तसेच सदर प्रकारची चौकशी करून यातील दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्यातअशी मागणी आमदार राहुल कुल यांनी केली आहे.