भिगवण : भिगवण परीसरामध्ये हॉटेल आणि राहते घरामध्ये घरफोडी, चोरी, विहीरीवरील इलेक्ट्रीक मोटार चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यांच्या भिगवण पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या चोरट्यांकडून तब्बल १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या चोरट्यांनी दिनांक. २३/१२/२०२१ रोजी मौजे डाळज नंबर. १ गावचे हददीतील रामदास पवार यांचे कृष्णा स्टोन क्रेशर येथील शेडच्या दरवाज्याची कडी काढुन तसेच दिनांक. २४/१२/२०२१ रोजी डाळज नंबर २ ता. इंदापुर, जि.पुणे गावचे हदीतील समीर अन्सारी यांचे राहते घरामध्ये व दिनांक, ०५/०१/२०२२ रोजी मौजे भादलवाडी गावचे हदीत बिल्ट कंपनीचे सिक्युरीटी गार्डचे
रूममधुन रोख रक्कम व मोबाईल असा एकुण १ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल घरफोडी, चोरी करून नेला होता. तसेच दिनांक. २१/०१/२०२२ रोजी मौजे मदनवाडी गावचे हद्दीतील ओढयाचे जवळील, विहीरीवरील २० हजार रुपये किमतीची इलेक्ट्रीक मोटार चोरून नेली होती.
सदरचे गुन्हे गंभीर स्वरूपाचे असल्याने व लोकांचे मनामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल्याने भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार, सहा.पोलीस निरीक्षक, यांनी गुन्हे शोध पथक
(डी.बी) यांना मार्गदर्शन केले. भिगवण पोलीस स्टेशन येथे वरील प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयांचा समांतर तपास चालु असताना गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाचे आधारे यातील आरोपी १) भैय्या सदाशिव काळे, २) कर्मा दासा भोसले, (दोघे रा. डाळज नंबर.१, ता. इंदापुर, जि.पुणे) यांना ताब्यात घेवुन तसेच सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी वरील गुन्हे केल्याची कबुली दिली. सर्व आरोपींना अटक केल्यानंतर आरोपींकडून चोरीस गेलेल्या मालापैकी १ लाख १० हजारांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच भिगवण पोलीस स्टेशनचे हदद्तील इलेक्ट्रीक पाण्याची
मोटार चोरणारे चोरटे १) राजेश जगदीश यादव, २) इस्वाईल रहमतउल्ला खान, (दोघे रा. मदनवाडी, ता. इंदापुर, जि.पुणे) यांना १२ तासाचे आत ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपुस करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांनाही सदर गुन्हयात अटक करून त्यांचेकडुन गुन्हयातील चोरीस गेलेली
विहीरीवरील इलेक्ट्रीक मोटार किं.रू २०,०००/- रू ची जप्त केली आहे. वरील अटक आरोपी यांचेकडुन खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
१) भिगवण पो.स्टे. गुन्हा.रजि.नं.३१६/२०२१, भादवि.कलम.४५७,३८०
२) भिगवण पो.स्टे. गुन्हा.रजि.नं.०५/२०२२, भादवि कलम.३७९, ३४
३) भिगवण पो.स्टे. गुन्हा.रजि.नं.०१६/२०२२, भादवि.कलम.३८०
४) भिगवण पो.स्टे. गुन्हा.रजि.नं.२०/२०२२,भादवि.कलम.३७९
सदरची कामगिरी मा. डॉ.अभिनव देशमुख सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा.मिलींद मोहीते सो, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण, मा. गणेश इंगळे सो, उपविभागीय पोलीस
अधीकारी, बारामती विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली दिलीप पवार, सहा.पोलीस निरीक्षक, भिगवण पो.स्टे, भिगवण पो.स्टेचे पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम, विनायक दडस पाटील, सुभाष रूपनवर, पोलीस
अंमलदार विजय खाडे, रामदास जाधव, समीर करे, सचिन पवार, महेश उगले, अंकुश माने, हसीम मुलाणी, दिपक वेताळ, पोलीस मित्र अतुल माने, यांनी केली आहे.