सहकारनामा इफेक्ट : महावितरणने कानगाव येथील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा केला पूर्ववत, कांदा लागणीला सुरुवात

दौंड : महावितरण कंपनीने सोमवार दिनांक 17 जानेवारी 2022 रोजी अचानक कृषी पंपाचा वीज पुरवठा हाय होल्टेज तार तोडून खंडित केला होता.
त्यावेळेस शेतकरी व महावितरणचे अधिकारी यांच्यामध्ये वाद निर्माण होऊन सदर वादाचे रुपांतर परस्पर विरोधी तक्रारी मध्ये झाले होते. या अवधीमध्ये खंडित केला केलेला वीज पुरवठा खंडित राहिला असल्याने येथील जनावरांना प्यायला पाणी उपलब्ध होत नव्हते तर कांदा रोपे लागणी रखडल्याने कांदा रोपे जळण्याच्या मार्गावर होती.हि सर्व परिस्थिती सहकारनामा न्यूज ने समोर आणल्यानंतर चार दिवसांत महावितरण कंपनीने सदर वीजपुरवठा सुरळीत केला. त्यामुळे रखडलेल्या कांदा लागणी सुरू झाल्या असून गुराढोरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला व इतरही पिकांना पाणी देणे सुरू झाले आहे. त्यामुळे कानगांवमधील ग्रामस्थ सध्या कामामध्ये मग्न झाले असून शेतकरी व महावितरण कंपनी वाद निवळत असल्याचे चिन्ह दिसत आहे.