BREAKING NEWS : यवत येथील ATM फोडणारी टोळी पकडली

पुणे : दौंड तालुक्यातील यवत येथे असणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्रचे ATM फोडून सुमारे 23 लाख रुपयांची चोरी करण्यात आली होती. याबाबत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत पोलिसांना सूचना केल्या होत्या. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ग्रामिण आणि यवत चे पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे व पोलीस पथकाने घटनास्थळी येऊन पाहणी केली होती. त्यानंतर पुणे ग्रामिण गुन्हे अन्वेषण विभाग आणि यवत पोलिसांच्या पथकाने पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत यातील मुख्य आरोपींना जेरबंद केले आहे आहे. या सर्व आरोपींची नावे आणि संपूर्ण माहिती ही आज गुरुवार दिनांक 20/01/2022 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, पुणे ग्रामीण कृष्णा हॉल येथे मा. पोलीस अधीक्षक साहेब पुणे ग्रामीण हे सायंकाळी 05.30 वाजता प्रेस कॉन्फरन्स घेऊन देणार आहेत.
पोलिसांनी घटना घडल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत आरोपींचा छडा लावून त्यांना जेरबंद केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.