शेतकरी, माल वाहतूकदारांकडून बेकायदेशीर हमाली / वाराई वसुली विरोधात रयत क्रांती आंदोलनाच्या पावित्र्यात – भानुदास शिंदे

पुणे : कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे येथे शेतकरी व मालवाहतुकदारांकडून अतिरिक्त हमाली, वाराई वसुली केली जात असल्याचा आरोप रयत क्रांती संघटनेचे प्रदेश प्रवक्ते भानुदास शिंदे यांनी केला आहे. ही बेकायदेशीर वसुली त्वरित न थांबविल्यास रयत क्रांती संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे. याबाबत भानुदास शिंदे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकांना तक्रारी अर्ज केला आहे.
सदर हमाली वाराई शासन नियम समिती नियमाप्रमाणे असलेल्या दराप्रमाणे १०० गडड़ी, खोके, करंडा आकारली जाणे अपेक्षित आहे मात्र सदर हमाली/वाराई ही नियमाप्रमाणे न आकारता मनमानी पदधतीने अनेकपटीने आकारली जात असल्यासाचा आरोप शिंदे यांनी पत्रामध्ये केला असून या लुटीचा विरोध केल्यास शेतकरी / वाहनचालक यांच्यावर दादागिरी करणे, दम देणे असे गुंडगिरीचे प्रकार समितीमध्ये होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे सर्व प्रकार हे सरळ गुंडगिरी व खंडणी वसुलीचे असून असले प्रकार त्वरीत थांबवून नियमाप्रमाणे हमाली, वाराई आकारावी अशी मागणी त्यांनी केली आहे. व सर्व परिस्थितीमध्ये शेतक-याचा, वाहनचालकाचा माल खराब झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार मार्केट कमिटी राहिल. व असे प्रकार चालू राहिल्यास वाहनधारकाला व शेतकरी याला स्वतः गाडीबरोबर हमाल आणण्यास परवानगी द्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे. हे सर्व न थांबल्यास रयत क्रांती संघटना तीव्र आंदोलन करेल असा इशाराही शेवटी त्यांनी दिला आहे.