Alert – सावधान.. भीमा नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे ! पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी नागरिकांना केले ‛हे’ आवाहन



|सहकारनामा|

दौंड : पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये सातत्याने मुसळधार पाऊस पडत आहे, यामुळे येथील भीमा नदी पात्रातील पाण्याची पातळी सुद्धा वेगामध्ये वाढत आहे. भीमा नदी पात्रा शेजारील पानसरे वस्ती, ईदगाह मैदान परिसरातील बेथेल कॉलनी, खाटीक गल्ली, मौलाना आजाद नगर, इंदिरानगर, कमाल वाडी तसेच भीम नगर परिसरातील भीमा नदी पात्रालगत असणाऱ्या लोकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन दौंड चे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी केले आहे. सध्या धरण क्षेत्रासह पुणे शहरात सातत्याने पावसाची संततधार सुरू आहे, पूर्ण क्षमतेने पाण्याने भरलेल्या धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे यामुळे भीमा नदीला पाणी वाढत आहे. 

सगळीकडेच ढगफुटी, अतिवृष्टी सुरू असून नद्या, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेलेले आहेत. ठिकाणी घाटामध्ये दरडी कोसळून वाहतूक बंद झाल्यामुळे अनेक जण अडकून पडले आहेत. धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने अनेक ठिकाणी दुर्देवी घटना घडल्या आहेत  अनेक जण वाहनासह पाण्यातून वाहून गेले आहेत. 

त्यामुळे जोपर्यंत पावसाचा जोर कमी होऊन पाण्याचा धोका कमी होत नाही तोपर्यंत आपल्या कुटुंबीयांना घेऊन वर्षा विहाराला कोठेही बाहेर जाऊ नका असे ही आवाहन नारायण पवार यांनी केले आहे.