31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर 9 लाख 50 हजारांची बनावट ‛दारू’ जप्त, आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी

पुणे : 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क, नारायणगांव विभाग, जि. पुणे या पथकाने एकलहरे (ता. आंबेगांव जि. पुणे) येथे मोठी कारवाई करत अंदाजे 9.50 लाखांची बनावट ‛दारू’ (मद्याचा मुद्देमाल) जप्त केला आहे.
हि कारवाई आयुक्त कांतीलालजी उमाप (राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई,) विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे
विभागीय उपायुक्त, (राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग, पुणे,) अधीक्षक संतोष झगडे (राज्य उत्पादन शुल्क, पुणे) व
उपअधीक्षक, पुणे जाधव, पाटील व शिंदे साो. यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नारायणगांव विभागाने केली आहे. नारायणगाव विभागास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दि. 30/12/2021 रोजी एकलहरे गावाचे हद्दीत, हॉटेल
पंचमीच्या मागे, (ता. आंबेगांव जि. पुणे) येथे बनावट मद्याची विक्री होणार असल्याचे समजले होते. त्या माहितीवरून वरील ठिकाणी सापळा रचून तपासणी करीत असताना दोन इसम बनावट देशी – विदेशीमद्य एक मारुती सुझुकी कपंनीच्या चारचाकी वाहन जिचा वाहन क्र. MH 12 SX 5296 या वाहनातून विक्रीच्या उद्देशाने घेवून जात असताना निदर्शनास आले. त्यांना पंचासमक्ष ताब्यात घेण्यात येऊन त्या इसमांकडे पुढील चौकशी केल्यावर सदरचा बनावट मद्यसाठा त्यांनी काळेवाडी, पिंपरी, पुणे येथे
निर्माण करुन तेथुनच ते ठोक ग्राहकांना वितरीत करीत असल्याचे सांगितले. त्याठिकाणी जावून त्यांच्या कब्जातुन सुमारे 9 लाख 50 हजारांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला.
तर यातील आरोपी 1) सागर तुकाराम कातोरे, (वय 42 वर्षे. रा. चिंबळी, ता. खेड, जि. पुणे) 2) मयुर बाळासाहेब कातोरे, (वय 26
वर्षे. रा. चिंबळी, ता. खेड, जि. पुणे) यांना महाराष्ट्र दारुबंदी 1949 चे कलम 65 (अ), (ब), (क), (ड), (ई) (फ), 80, 81, 83, 90, 98 (2) व 103 अन्वये जागीच अटक करुन त्यांच्या विरुद्ध गुन्हा रजि. क्र. 251/2021 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. त्यांना आज दि. 31/12/2021 रोजी मा. न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना
दि. 03/01/ 2022 पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे. सदर कारवाईमध्ये निरीक्षक श्री. ए. बी. पवार, निरीक्षक, श्री. एस. एम. परले, दुय्यम-निरीक्षक श्री. एम. एस. धोका, श्री. एन. आर. मुंजाळ, सहाय्यक दुय्यमनिरीक्षक श्री. जी. एम. नीळ, एस. वाय दरेकर जवान सर्वश्री जे. जी. दाते, व्ही. डी. विंचुरकर, एम. टी. केंगले व जवान नि वाहनचालक श्री. आर. ए. पाचारणे हे सहभागी होते. या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक श्री. ए. बी. पवार हे करीत आहेत.