पुणे शहरातील महिला पोलीस निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या, पोलीस दलात खळबळ

पुणे शहर : पोलीस दलात खळबळ माजविणारी घटना पुणे शहरात घडली असून पुणे शहर पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या शिल्पा चव्हाण या महिला पोलीस निरीक्षकाने आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक
घटना घडली आहे.
पोलीस निरीक्षकांच्या आत्महत्येने पुणे शहरासह पोलीस दलात प्रचंड खळबळ मजली आहे. कौटुंबिक करणातून त्यांनी आत्महत्या केल्याचे कारण समोर येत असून याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी माहिती दिली आहे. शिल्पा चव्हाण यांना एक मुलगा असून तो सध्या आपल्या गावी गेल्याचे समजत आहे. पोलिसांनी या आत्महत्येप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद केली आहे.
मृत महिला पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण ह्या शहर पोलीस दलात कार्यरत होत्या. त्यांच्याकडे सध्या सामाजिक सुरक्षा विभागाचा पदभार होता. त्यांनी आत्महत्या केल्याची घटना ही पोलीस त्यांच्या घरी गेल्यानंतर उघडकीस आली आहे. त्या फोनवर कुठलाही प्रतिसाद देत नसल्याने पोलिसांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
महिला पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी आत्महत्या का केली याबाबत तर्क वितर्क लावले जात होते मात्र त्यांची आत्महत्या कौटुंबिक करणातून झाल्यानंतर चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.