दौंड येथे 2 लाख 49 हजारांचा अवैध गुटखा जप्त दोघे जेरबंद : पुणे ग्रामिण LCB ची कारवाई



|सहकारनामा|

दौंड : दिनांक 24/07/2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडिल पोलीस पथक दौंड पोलीस स्टेशन हद्दीत पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, दौंड, पाटील चौक येथे इसम सुनील मारुती यादव हा आपले कब्जात प्रतिबंधित करण्यात आलेला पान मसाला, सुगंधी तंबाखू व गुटखा याची बेकायदेशीररित्या साठवण करून विक्री करत आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्याने मिळालेल्या  माहितीच्या अनुषंगाने पंचांना सोबत घेऊन पाटील चौक, दौंड येथे जाऊन इसम सुनील मारुती यादव हा त्याचेकडील मारुती ओमिनी कार नंबर MH 42 H 665 यासह मिळून आला. 

त्याचे ओमिनी कारची पंचासमक्ष  झडती घेतली असता त्यामध्ये प्रतिबंधित करण्यात आलेला पान मसाला सुगंधी तंबाखू असा कारसह 2,06,000/- रूपये किमतीचा माल विक्री करण्याच्या उद्देशाने त्याचे कब्जात बाळगला असता मिळून आला. तसेच सदरचा माल हा त्याने त्याचे ओळखीचा व्यापारी नरेश हियालदास रोहिडा यांचेकडून घेतल्याचे समक्ष सांगितले त्यावरून नरेश रोहिडा याचे गोल्डन जनरल स्टोअर्स याठिकाणी जाऊन त्याचेकडे अधिक माहिती घेता पंचासमक्ष त्याचे दुकानातून 43000/- रूपये किमतीचा प्रतिबंधित करण्यात आलेला पान मसाला, सुगंधी तंबाखू  विक्री करण्याच्या उद्देशाने साठवण केलेला काढून दिला. 

सदर कारवाईत  एकूण 2,49,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीं विरुद्ध दौंड  पोलीस स्टेशन येथे भादवि कलम 188, 272, 273, 328 सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 चे कलम 30(2)(I), 26(2)(I), 26(2)(IV) कलम 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून  आरोपी व मुद्देमाल पुढील तपास कामी दौंड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. 

सदरची कारवाई ही मा.पोलिस अधिक्षक श्री.डॉ.अभिनव देशमुख सो, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते सो यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट सहा.पो.नि. सचिन काळे  सहा.फौ. महेंद्र गायकवाड , पो.हवा. सचिन गायकवाड, पो.हवा. गुरु गायकवाड, पो हवा सुभाष राऊत, पो ना अभिजित एकशिंगे  यांनी केली आहे.