मल्हारी बारवकर याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली ‛चिट्ठी’ सापडली, त्यामध्ये त्याने लिहिलेलं वाचून तुमचेही डोळे पाणवतील

दौंड : MPSC चा विद्यार्थी असणारा मल्हारी बारवकर या विद्यार्थ्याने आज सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आणि दौंड तालुक्यात एकच खळबळ माजली. कारण MPSC ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याची ही दुसरी वेळ असून या अगोदर स्वप्नील लोणकर या केडगाव येथील मूळ रहिवासी असणाऱ्या विद्यार्थ्याने काही महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती.
मल्हारी बारवकर या विद्यार्थ्याने आज आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती ती आता त्याच्या घरच्या लोकांना सापडली असून त्या चिठ्ठीमध्ये त्याने मी तुम्हाला दाखवलेली स्वप्ने आता पूर्ण करू शकत नाही, आणि तुमचे पडलेले चेहरेही पाहू शकत नाही. आत्महत्येस जबाबदार नाही, अतिविचार, संपलेला आत्मविश्वास, भविष्यातही काही सकारात्मक चित्र दिसत नाही. चांगलं जगण्याच्या सगळ्या आशा संपल्या आहेत sorry’ असं या चिठ्ठीत मल्हारी बारवकर याने लिहून आत्महत्या केली आहे.
MPSC चा घोळ चालल्यामुळे मल्हारी खूप डिस्टर्ब असायचा आणि त्याने mpsc विद्यार्थ्यांच्या लढ्यातही सहभाग घेतल्याचे त्याच्या नातेवाईकांनी माहिती दिली. आर्थिक परिस्थिती बिकट बनली असतानाही त्याला घरच्या लोकांनी पुण्यात क्लासेस लावले होते. घरच्या लोकांना आपल्यामुळे आर्थिक ताण हिट असल्याने तो जास्तच तणावात होता. जानेवारीमध्ये त्याचे MPSC चे पेपर होते मात्र नैराश्यातून त्याने अगोदरच आपले जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.