‛दारू पिऊन’ वाहन चालवणाऱ्या दोन वाहन चालकांवर ‛पाटस’मध्ये गुन्हा दाखल

दौंड : दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या दोन वाहन चालकांवर पाटस (यवत) पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पाटस ते भीमा सहकारी साखर कारखाना रोडवर रहदारीच्या ठिकाणी आरोपी दुचाकी चालक हिरामण चिंतामण सोनवणे व दुसरा दुचाकी वाहन चालक आरोपी महेश विलास खोमणे हे दोन दुचाकीस्वार दारू पिऊन वाहन चालवताना पोलिसांना आढळून आले.

पोलिसांनी या दुचाकीस्वारांना अडवून त्यांची चौकशी केली असता ते दारू पिल्याचे व त्याच परिस्थितीमध्ये दुचाकी चालवत असल्याचे मिळून आले. त्यामुळे त्यांच्यावर पोलीस कॉन्स्टेबल समीर राहुल भालेराव यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोह कदम करीत आहेत.