दौंड : विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दौंड तालुक्यातील गिरिम गावातील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पती,सासू, सासरे व दीर यांचा समावेश आहे. जीवन माणिक उर्फ जयसिंग कोळपे, माणिक उर्फ जयसिंग राजाराम कोळपे लता माणिक उर्फ जयसिंग कोळपे मनोज माणिक उर्फ जयसिंग कोळपे( सर्व रा. मदनेवस्ती,गिरिम ,दौंड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. विठ्ठल दादा फुलारी( जाधव वाडी, गिरिम) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी दोन वर्षांपूर्वी मुलीच्या सासरच्या लोकांवरील दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा या कारणासाठी फिर्यादी यांच्या मुलीचा पती, सासू,, सासरे व दीर यांनी ऑक्टोबर 2021 ते दिनांक 11 डिसेंबर 2021 रात्री 8.30 वा. दरम्यान शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले, ह्या कारणास्तव फिर्यादी यांनी मुलीच्या सासरच्या लोकांविरोधात दौंड पोलिसात तक्रार केली. दौंड पोलिसांनी चौघां विरोधात भा. द.वि. कलम 306,498अ,323,506,34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.