दौंड : दौंड तालुक्यातील यवत येथे गुटखा अड्ड्यावर छापा मारून तब्बल 17 लाख 44 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्रांती बारवकर (अन्न व औषध प्रशासन अधिकारी, पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी राजेंद्र गणपत मलभारे व राहुल राजेंद्र मलभारे (रा. दोघेही मलभारे वस्ती, यवत ता.दौंड) या दोन आरोपींनी त्यांच्या ताब्यातील महिंद्रा बोलोरो पिक अप गाडी नं. ए.एच
४२, एक्यु ४९३० हिच्यामध्ये गुटखा आणि सुगंधी पानमसाला मालाचा साठा हा विक्री
करण्याच्या उद्देशाने वरील वाहनात साठवणूक करून ठेवण्यात आल्याचे या पथकाने मारलेल्या छाप्यात निदर्शनास आले.
अन्न व औषध प्रशासनाच्या या छाप्यात केसरयुक्त विमल पान मसाला, व्ही वन सुगंधित तबाखुचे पॅकेट्स, केसरयुक्त विमल
पान मसाला, व्ही वन सुगंधित
तुबाखु, केसरयुक्त विमल पानमसाला (हिरवा) सुगंधीत तंबाखुचे पॅकेट्स, राजु
इलायची सुगंधित तुबाखुचे व ७,००,०००/- रुपये किमतीची महिंद्रा बोलोरो पिक अप असा १७,४४,४४०/-रू किमतीचा मुद्देमाल पकडण्यात आला असून आरोपींवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.