संतोष जगताप ‛खून’ प्रकरणी 7 जणांना ‛मोक्का’, एका वर्षात 60 टोळ्यांवर ‛मोक्का’ ची कारवाई

विशेष गुन्हे वृत्त

लोणीकाळभोर : लोणी काळभोर पोलीस स्टेशनकडुन संघटित गुन्हेगारी करुन दहशत निर्माण करणा-या महादेव बाळासाहेब
आदलिंगे याचे गुन्हेगारी टोळीवर मकोका कायद्या अंतर्गत कारवाई लोणी काळभोर पोलीस स्टेशनकडील रेकॉर्डवरील आरोपी १) महादेव बाळासाहेब आदलिंगे, (वय
२८ रा.जुनी तांबेवस्ती,दत्तवाडी,उरूळी कांचन,हवेली,जि.पुणे) (टोळी प्रमुख) याची त्याचे साथीदारासह इकडील भागात गुन्हेगारी टोळी सक्रिय असुन त्यांनी आजुबाजूचे भागात शरीराविरूध्द तसेच मालमत्तेविरूध्द गुन्हे
केले असुन अवैध मार्गाने आर्थिक प्राप्तीसाठी आपले गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित करण्याचे हेतूने, खुन, खुनाचा प्रयत्न, खुनाची सुपारी देणे ,अग्निशस्त्रा विक्री विनापरवाना अग्निशस्त्र बाळगणे दुखापत व
हमला करण्याची पुर्व तयारी करून गृहअतिक्रमण करणे, बेकायदेशीर जमाव जमवुन, दंगा करून दहशत निर्माण
करणे अशा स्वरुपाची गुन्हेगारी कृत्ये सातत्याने चालू ठेवलेली आहेत.
त्यानंतर टोळीप्रमुख महादेव बाळासाहेब आदलिंगे याने आपले साथीदार आरोपी १.स्वागत बापु खैरे,(वय-२५.रा.उरूळी कांचन,हवेली.पुणे मयत-टोळी सदस्य) २.पवन उर्फ प्रशांत गोरख मिसाळ ,(वय२९.रा दत्तवाडी,भवरापुर रोड,उरूळी कांचन,हवेली.पुणे /टोळी सदस्य) ३.उमेश सोपान सोनवणे, (वय३५,रा मुंपो.राहु,ता दौण्ड,जि.पुणे -टोळी सदस्य) ४.अभिजीत अर्जुन यादव (वय-२२,रा मेडद ता. बारामती,
जि.पुणे -टोळी सदस्य) ५.आकाश उर्फ बाळु जगन्नाथ वाघमोडे,(वय-२८,रा.पटेल चौक, कुर्दुवाडी, ता. माढा,
जि.सोलापुर /टोळी सदस्य) ६.महेश भाऊसाहेब सोनवणे,(वय-२८,रा.भांडवाडी वस्ती,राहु ता.दौण्ड,जि.पुणे
-टोळी सदस्य) यांचे मदतीने आपली दहशत व टोळीचे वर्चस्व निर्माण करण्याकरीता आरोपी उमेश सोनवणे याचे भावाचा सन २०११ मध्ये झालेल्या खुनाचा बदला घेण्यासाठी व अवैध वाळु व्यवसाय करण्याचे उद्देशाने संतोष संपतराव जगताप याला पिस्टल मधुन गोळ्या घालुन जीवे ठार मारल्याने त्यांचेवर लोणी काळभोर पोलीस स्टेशन गु.रजि.नं.५७१/२०२५ भादविक ३०२,३०७.१२०(ब),आर्म अॅक्ट ३(२५).क्रि.लॉ अॅक्ट कलम३(७) हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर आरोपीवरती शरीराविरुध्द व मालाविरुध्द पुणे शहर, पुणे रेल्वे, पुणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड, सोलापुर व उस्मानाबाद जिल्हा असे विविध पो स्टे मध्ये एकुण १५ गुन्हे दाखल असुन त्याचेवर प्रतिबंधक कारवाई करुन देखील,त्यांनी पुन्हा गुन्हे केले आहेत. त्यांची लोणी काळभोर
परिसरात दहशत असुन त्यांचे दहशती मुले तक्रार करण्यास कोणाही धजावत नसल्याने त्यांच्या बेकायदेशिर कृत्याना आळा घालण्याकरीता,त्यांचे विरूध्द नमुद गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३(१४i).३(२),३(४) चा अंर्तभाव करून मोक्का कायदयान्वये कारवाई होण्याचा प्रस्ताव श्री राजेंद्र मोकाशी,वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे यांनी श्रीमती नम्रता पाटील, मा.पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-५ यांचे मार्फतीने श्री.नामदेव चव्हाण मा.अपर पोलीस आयुक्त सो. पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, यांना सादर केला होता.
सदर प्रस्तावाची छाननी करून आरोपी १.महादेव बाळासाहेब आदलिंगे,वय-२८.रा.जुनी तांबेवरती,
दत्तवाडी,उरूळी कांचन,हवेली,जि.पुणे याने आपले साथीदार आरोपी नामे २.स्वागत बापु खैरे,वय-२५.रा.उरूळी
कांचन,हवेली,पुणे (मयत-टोळी सदस्य) ३.पवन उर्फ प्रशांत गोरख मिसाळ वय-२९, रा.दत्तवाडी,भवरापुर
रोड,उरूळी कांचन,हवेली,पुणे (टोली सदस्य) ४.उमेश सोपान सोनवणे, वय-३५,रा.मुंपो.राहु,ता.दौण्ड,जि.पुणे
(टोळी सदस्य) ५.अभिजीत अर्जुन यादव वय-२२.रा.मेडद ता. बारामती, जि. पुणे (टोळी सदस्य) ६.आकाश
उर्फ बाळु जगन्नाथ वाघमोडे,वय-२८.रा.पटेल चौक, कुर्डवाडी, ता. माढा, जि. सोलापुर (टोळी सदस्य)
७.महेश भाऊसाहेब सोनवणे,वय-२८.रा.भांडवाडी वस्ती,राहु,ता.दौण्ड,जि.पुणे (टोळी सदस्य) यांचे यांचे विरूध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलमांचा समावेश करणे बाबत श्री. नामदेव चव्हाण,मा.अपर
पोलीस आयुक्त,पुर्व प्रादेशीक विभाग,पुणे यांनी मंजूरी दिल्याने आरोपी विरूध्द मकोका कायद्या अंतर्गत पुढील
कारवाई केली आहे

सदरची कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त पुणे शहर ,श्री.अमिताभ गुप्ता, मा.पोलीस सह आयुक्त पुणे शहर डॉ.रविंद्र शिसवे, मा.श्री.नामदेव चव्हाण अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे श्रीमती.
नम्रता पाटील,पोलीस उप-आयुक्त साो, परिमंडळ-५.पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली श्री.राजेंद्र मोकाशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर, पोलीस उप-निरीक्षक अमित गोरे,पोलीस अंमलदार गणेश सातपुते, संदिप धनवटे, गणेश भापकर, मल्हारी ढमढेरे यांनी केलेली असून सदर गुन्हयाचा तपास मा.सहा.पोलीस आयुक्त,हडपसर विभाग,पुणे शहर,श्री.कल्याणराव विधाते हे करीत आहेत.
मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर,श्री.अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहराचा कार्यभार हाती घेतल्या नंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष ठेवले असून,गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन होईल यावर अधिक भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली
मागील एक वर्षा पासुन मकोका कायद्याअंतर्गत झालेली ही ६० वी कारवाई आहे.