जमिनीच्या वादातून महिलांनी तलवारी काढल्या, 6 जणांवर गुन्हा दाखल

सासवड : सामायिक असणारी जमीन कुणी विकू नये म्हणून जमिनीत जमीन मालकांचे बोर्ड लावत असताना पुरुष आणि महिलांनी हातात तलवारी घेऊन येत दहशत माजविल्याची घटना सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अशोक कृष्णा वचकल (रा.वय 61,वीर,ता.पुरंदर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते आणि त्यांचे चुलत भाऊ यांचे एकत्रीत जमिनीची आपसात वाटप झालेल्या जमिनीची कोणीही विक्री करू नये म्हणून सर्व जमिन मालकांचे नावाचे बोर्ड लावत
असताना तेथे 1) विजय दगडू वचकल याने त्यांना हाताने मारहाण करून 2) योगेश दगडू
वचकल 3) सारीका विजय वचकल यांनी
हातामध्ये तलवारी घेवून येत शिवीगाळ करून
दहशत माजवून त्यांना जिवे मारण्याची
धमकी दिली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यावेळी तेथे त्यांच्यासोबत आलेल्या 3 नातेवाईकांनी फिर्यादींना शिवीगाळ व दमदाटी केली असल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

या सर्व प्रकरणाची सासवड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार जाधव करीत आहेत.