दौंड एसटी आगारातील आंदोलक कर्मचाऱ्यांची ‛भाजपा व्यापारी आघाडी’ ने केली दिवाळी गोड, कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळ व पोशाख भेट

दौंड : संपूर्ण राज्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्या मान्य होण्यासाठी बेमुदत संप पुकारला आहे. या अनुषंगाने दौंड एसटी आगारातील कर्मचाऱ्यांनी सुद्धा दौंड मध्ये बेमुदत संप सुरू केला आहे. ऐन दिवाळीमध्ये संप करावा लागल्याने कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबाला दिवाळी करता आली नाही. याची सामाजिक जाणीव ठेवून भारतीय जनता पार्टी,, व्यापारी आघाडीचे व स्वच्छ भारत अभियानाचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील शहा यांच्या पुढाकाराने पक्षाच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळ व 163 कर्मचाऱ्यांना पोशाख भेट देण्यात आले. तसेच पक्षातर्फे आंदोलनाला पाठिंबा ही देण्यात आला.
यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. राज्य सरकारने आमचे संसार रस्त्यावर आणण्याचे काम केले आहे त्यामुळे आमच्या मागण्या पूर्ण होई पर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार केला.
भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी स्वप्नील ठाणगे,रवींद्र बंड, उपेश तूपसौंदर्य, राहुल भंडारी,ओंकार तारू, विशाल महामुनी व सचिन महामुनी यांचे उपक्रमास सहकार्य लाभले. दौंड मेडिकल असोसिएशन यांनीसुद्धा आंदोलनास पाठिंबा दर्शविला.