Crime – ‛हडपसर’ पोलीसांनी पकडली ‛केडगाव’(दौंड) येथील ‛दुचाकी’ चोरट्यांची टोळी, 4 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त



|सहकारनामा|

पुणे : ग्रामिण भागामध्ये  मोटारसायकल चोरी करणा-या टोळीचा पर्दाफाश करण्यात हडपसर पोलिसांना यश आले असून दुचाकी चोरणारे चोरटे हे दौंड तालुक्यातील केडगाव आणि कडेठाण परिसरातील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून हडपसर पोलिसांनी आरोपींकडून

एकुण १० मोटार सायकल, एक ऑटो रिक्षा असा एकुण 4 लाख 30 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करत तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहनचोरीच्या घटनेत वाढ झाल्याने मा.वरिष्ठांच्या आदेशाने व मार्गदर्शानुसार वाहनचोरीचे गुन्हे उघड करण्याकरिता दिलेल्या सुचनाप्रमाणे दिनांक २९/०७/२०२१ रोजी १५/०० वाजण्याच्या सुमारास हडपसर पोलीस स्टेशन तपास पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उप निरीक्षक सौरभ माने, पोलीस हवा. प्रदीप सोनवणे, प्रताप गायकवाड, गणेश क्षिरसागर, पो.ना. अविनाश गोसावी, समीर पांडूळे, पो.शि. अकबर शेख, शाहीद शेख, प्रशांत टोणपे, शशिकांत नाळे, निखील पवार, प्रशांत दुधाळ असे दोन पथकासह गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पो.उप.निरी. सौरभ माने आणि पो.ना.अविनाश गोसावी यांना एक संशयित इसम हा ससाणेनगर परीसरात कॅनॉलचे पुलावर क्रमांक नसलेल्या एका स्प्लेंडर मोटारसायकलवर थांबला असल्याचे दिसले.

तपास पथकाच्या अधिकारी आणि अंमलदार यांना त्या इसमाचा संशय आल्याने यांनी त्यास विचारपूस केली त्यावेळी तो कावरा बावरा होवून उडवा

उडवीचे उत्तरे देवू लागला. त्यास अधिक विचारणा केली असता त्याने त्याचे सोबतचे दोन साथीदार

हे बाजूला हात दाखवून मोटार सायकल आणणे करीता आत गेले असल्याचे सांगितले. त्याने पोलीसांना दिलेली माहिती ही संशयास्पद वाटत असल्याने त्याचा मोबाईल फोन ताब्यात घेवून त्याचे दोन साथीदारांची वाट पाहत पथकातील अधिकारी अमंलदार यांनी कॅनॉलच्या पुलावर सापळा लावला. त्याचवेळी त्याठिकाणी इतर पेट्रोलिंगचे पथकास बोलावून त्यांना देखील सदर सापळा कारवाईमध्ये समाविष्ठ करून घेण्यात आले. सुमारे अर्ध्या तासानंतर त्याचे दोन साथीदार एका शाईन मोटारसायकल क्रमांक एम.एच.१२/एल.क्यू/५१८३ वरून तो थांबलेल्या ठिकाणी आले. त्याचवेळी पथकातील अधिकारी अंमलदार यांनी लागलीच त्यांना ताब्यात घेवून दोन मोटारसायकली सह हडपसर पोलीस ठाणे येथे आणून आरोपींना विश्वासात घेवून त्यांचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे (१) महेश लक्ष्मण धुमाळ (वय २३ वर्ष, रा. आंबेगाव ता. दौंड जिल्हा पुणे) (२) प्रतिक संदीप काळे (वय २१ वर्ष रा.वेताळनगर केडगाव ता. दौंड जिल्हा पुणे) (३) महेश दिलीप जगताप (वय २३ रा. मळईवस्ती, कडेठाण ता.दौंड जिल्हा पुणे) अशी सांगितली. 

आरोपींना मोटार सायकली बाबत विचारणा

केली असता त्यांनी माहिती देताना दोन्ही मोटारसायकल ह्या चोरी केलेल्या असून त्यातील एक मोटारसायकल ही गोंधळेनगर येथून चोरी केली असल्याचे व त्याच मोटार सायकलवरून ट्रिपल सीट येवून दुसरी गाडी चोरून घेवून जाणेकरीता ससाणेनगर परीसरात आल्याचे व तेथे महेश जगताप यास चोरीच्या गाडीसह कॅनॉलच्या पुलावर थांबून त्याचे दोन साथीदार महेश धुमाळ आणि प्रतिक काळे हे दुसरी गाडी चोरी करणे करीता गेले असल्याचे सांगितले. यानंतर त्या दोघांनी तेथून एक शाईन मोटारसायकल चोरी करून आणली असल्याची माहिती पोलीसांना दिली. 

यावेळी पोलिसांनी दोन्ही मोटारसायकल बाबत माहिती घेतली असता हडपसर पोलीस ठाणे येथे अनुक्रमे (१) हडपसर पोलीस ठाणे गु.रजि.नं. ५७४/२०२१ भा.द.वि. ३७९ (२) हडपसर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ५७२/२०२१ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा नोद असल्याचे निष्पन्न झाले.

वरील आरोपी हे मोटारसायकल चोरीच्या गुन्हयात सराईत असल्याचे गृहीत धरून त्यांना विश्वासात घेवून अधिक तपास केला असता त्यांनी खालील नमूद केलेप्रमाणे मोटारसायकल व रिक्षा

चो-या केल्या असल्याची कबुली दिली आहे. आरोपींकडून खालीलप्रमाणे गुन्हे उघड झालेले आहेत.

१. हडपसर पोलीस स्टेशन गु.रजि.क्रं- ५४५/२०२१ भा.द.वि कलम ३७९ अॅक्टिव्हा मोपेड

२. हडपसर पोलीस स्टेशन गु.रजि.क्रं- ५५०/२०२१ भा.द.वि कलम ३७९ अॅक्टिव्हा मोपेड

३. लोणी काळभोर पो.ठाणे गु-रजि.क्रं- २२३/२०२१ भा.द.वि कलम ३७९ एक ॲटो रिक्षा

४. लोणीकंद पोलीस ठाणे गु.रजि.क्रं- ९६५/२०१८ भा.द.वि कलम ३७९ एक युनिकॉन

मो.सायकल

५. चिखली पोलीस स्टेशन गु.रजि.क्रं- ४७/२०२१ भा.द.वि कलम ३७९ अॅक्टिव्हा मोपेड

६. फौजदार चावडी पो. ठाणे सोलापूर गु.रजि.क्रं-४०/२०२० भा.द.वि कलम ३७९ पॅशन

प्रो.मो.सा.

७. मौजे हातवळण ता.दौंड येथून हिरो स्प्लेंडर प्लस चोरी केली असल्याचे कबूल केले असून त्याचा चे.सी क्रमांक 06A16FO3870 असा आहे. सदर गाडीचे मालकीहक्काबाबत माहिती मिळून येत नाही.

८. मौजे बोरीपार्धी चौफुला साई दर्शन हॉस्पिटल समोर येथून एक शाईन मो.सा. चोरी केली असल्याचे कबूल केले असून त्याचा चे.सी.क्रमांक ME4JC36JBE7811613 व इंजिन क्रमांक

JC36E73312485 असा आहे. सदर गाडीचे मालकी हक्काबाबत माहिती मिळून येत

नाही.

९. भारती विद्यापीठ परीसरातून एक हिरो होंडा स्प्लेंडर मो.सा. चोरी केली असल्याचे

केले असून त्याचा चे.सी.क्रमांक 00j20F29070 असा आहे. सदर गाडीचे मालकी हक्काबाबत माहिती मिळून येत नाही.

वरील प्रमाणे हडपसर पोलीस ठाणे ०४ लोणी काळभोर पोलीस ठाणे ०१, (रिक्षा) लोणीकंद पोलीस ठाणे ०१, चिखली पोलीस ठाणे ०१, फौजदार चावडी सोलापूर

पोलीस ठाणे ०१, व इतर ०३ अशा एकुण १० मोटारसायकल व एक अॅटो रिक्षा असे  आरोपींकडून एकुण ११ गुन्हे उघड झाले आहेत व एकुण 4 लाख 30 हजार रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. वरील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

सदरची कामगिरी ही मा.श्री.नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व मा. नम्रता पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ पुणे शहर, यांचे सुचना व मागदर्शनाखाली मा.श्री. कल्याणराव विधाते, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्री. बाळकृष्ण कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. राजु अडागळे, पोनि (गुन्हे) श्री. दिगबंर शिंदे पोनि (गुन्हे) यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उप निरीक्षक सौरभ माने, पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे, प्रताप गायकवाड, गणेश क्षिरसागर, पोलीस नाईक अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पांडुळे, पोलीस शिपाई अकबर शेख , शाहीद शेख, शशिकांत नाळे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

सदरच्या कामगिरी बाबत मा.पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता सोा. पुणे शहर यांनी अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.