पालघर : पालघरच्या डहाणू जवळ असणाऱ्या वाणगाव येथे एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाने भरधाव वेगाने गाडी चालवून दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना उडवून गाडी तशीच पळवून नेल्याची आणि पुढेही काही पादचाऱ्यांना उडविल्याची गंभीर घटना समोर येत आहे. याबाबत आता सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे याच्यावर वाणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तारापूर येथून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे याने येत असताना तारापूर फाट्यावर त्याने एका स्कुटी चालकाला जोरदार धडक दिली यात एकजण गंभीर जखमी झाला. त्यानंतर खरमाटे याने तेथे न थांबता गाडी तशीच पुढे दामतट काही पादचाऱ्यांना उडवल्याचे सांगितले जात आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे याने चिंचणी ते डहाणू प्रवास करताना बाजूनं चालत असलेल्या पती-पत्नीला धडक दिली. यात गाडी पंक्चर झालेली असतानाही आरोपीने तब्बल 18 किलोमीटर ही गाडी तशीच मॅकव्हीलवर चालवत एका पोलीस ठाण्यासमोर लावून तो फरार झाला अशी माहिती
पोलीस उपअधीक्षकांनी दिली.
सुहास खरमाटे हा डहाणू पोलीस ठाण्याचा सहाय्यक पोलीस निरीक्षक असून त्याच्या विरोधात वाणगाव पोलीस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुहास खरमाटे याने तारापूर ते डहाणू अशी भरधाव गाडी चालवून
अपघात करत अन्य काहींना जखमी केल्याचे समोर येत आहे. या अपघातातील एकाची प्रकृती चिंताजनक असून त्या व्यक्तीला नानावटी रुग्णालयात
हलविण्यात आले आहे.