मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री पद मिळवलं आहे अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी युद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. आज एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.
नारायण राणे यांनी महा विकास आघाडी सरकारवर चौफेर हल्ला चढवताना हे लोक सत्तेसाठी लाचार आहेत. यांनी अगोदर एकदूसऱ्याला नावे ठेवली आणि मग एकत्र येऊन सत्ता स्थापन केली असे नारायण राणे म्हणत जे लोक म्हणत होते की पवार सोनिया गांधींवर टीका करत बाहेर पडले, आणि सोनिया गांधींपुढे नाक घासत सरकार बनवले असला लाचारपणा आमच्याकडे नाही असे जे म्हणत होते त्यांनीच शरद पवारांकडे जाऊन लाचारीने मुख्यमंत्रीपद स्वीकारले. अगोदर यांनी शिव्या दिल्या, नावे ठेवली आणि आता त्यांच्यामुळेच आपल्याला हे सर्वकाही मिळालं असं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बारामतीमध्ये जाऊन म्हणतायत. मात्र अगोदर त्यांच्यावर टीका करताना अजित पवारांचे रडणे म्हणजे मगरीचे आसू असे हेच म्हणायचे अनो आता त्यांच्याच पाठिंब्यावर सत्तेत बसले असेल्याचेही त्यांनी म्हटले आहे. एक खासरदार निवडून आला म्हणून यांना आम्ही (शिवसेना) पंतप्रधान झालो असे वाटत असेल पुढील निवडणुकांत या सर्वांच्या देशात 8 सुद्धा जागा निवडून येणार नाहीत हे यांना माहीत आहे त्यामुळे हे काहीही बोलत असून कसेही वागत आहेत.
भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर होत असलेल्या टिकेवरून नारायण राणे भलतेच चिडले होते त्यामुळे त्यांनी थेट आघाडी सरकारला इशारा देताना भाजप, फडणवीस यांच्यावर टीका करायची नाही जर केली तर जशासतसे उत्तर मिळेल असा इशाराच देऊन टाकला. आणि आता तुम्ही स्वबळावर लढा म्हणजे तुमची पात्रता तुम्हाला समजेल असा टोला शिवसेनेला लगावला आहे.
नवाब मलिक यांच्या प्रश्नावर बोलताना ते रविवारी धमाका करणार म्हणतायत तर आम्ही तरी कुठे त्यांचे तोंड, हाथ धरले आहेत. उलट त्याचं तर बरंच काही निघणार आहे आणि ते एकदम उंबरठ्यावर आहे सूचक इशारा त्यांनी मलिकांना दिला आहे.
त्या संजय राऊत यांच्याबाबत बोलताना त्यांनी एकेरी भाषेत त्यांचा उल्लेख करत संजय राउतला काही कळतं का?? संजय राऊत सरकला आहे त्यामुळे तो काहीही बरळत आहे असे म्हणून
या सरकारला जनाची नाही तर मनाची तरी.. हवी. हे लोक महाराष्ट्राचा खेळ खंडोबा करणार बघा असे म्हणत चौफेर टीका केली.