शिक्रापूर : आपल्या जवळ बनावट नोटा बाळगून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमाला पुणे शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे.
शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार जयराज देवकर यांना शिक्रापूर तळेगाव ढमढेरे रोडवर तळेगावच्या हद्दीत एक इसम त्याच्या जवळील भारतीय चलनाच्या बनावट नोटा चलनात आणण्यासाठी घेवुन येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या आदेशान्वये शिकापुर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे स.पो.नि.श्री नितीन अतकरे व पथकातील अंमलदार यांनी तळेगाव ढमढेरे ते शिक्रापूर गावाकडे जाणाऱ्या रोडवर साईनाथ मेडीकल जवळ सापळा लावला असता तेथे मुकेश राजेंद्र पडिकेन हा संशयित इसम तेथे आढळून आला.
पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली त्यावेळी त्याच्याजवळ 200 रुपायांच्या 180 नोटा असे 36 हजार रुपये मिळून आले. सदर इसमाविरूद्ध पो.कॉ जयराज
देवकर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनला कायदेशीर फिर्याद दिली आहे.
सदरची कामगीरी ही पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण
पथकाचे स.पो.नि. नितीन अतकरे, पो हवा जितेद्र पानसरे, पो ना अमोल दांडगे, श्रीमंत
होणमाने, रोहीदास पारखे, अमोल नलगे, विकास पाटील, पो कॉ जयराज देवकर, किशोर शिवणकर , निखील रावडे, लखन शिरसकर यांच्या पथकाने केली असून गुन्हयाचा पुढील तपास पो.स.ई अमोल खटावकर व पो ना पखाले हे करीत आहेत.