पुणे / उरुळी : उरुळी कांचन येथील खून प्रकरण गाजत असतानाच पुन्हा एकदा येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील डॉ. मानिभाई देसाई पतसंस्थेच्या बाहेर लावण्यात आलेल्या एका चारचाकी गाडीची काच फोडण्यात आली असून या गाडीतून तब्बल ५० हजार रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची घटना घडली आहे. हि घटना आज सोमवार रोजीबसकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
राजेंद्र खंडू तावरे (वय- ४९, रा. बोरिऐंदी , ता. दौंड ) असे फिर्यादीचे नाव असून त्यांच्या गाडीची काच फोडून पैसे चोरीला गेले आहेत. राजेंद्र तावरे व त्यांचे मित्र नवनाथ थोरात हे बोरिऐंदी येथून उरुळी कांचन येथे चारचाकी गाडी घेऊन आले होते. त्यांनी पुणे सोलापूर महामार्गाच्या बाजूला असलेल्या आयसीआयसीआय बँकेतून सकाळी पाऊने अकरा वाजण्याच्या सुमारास चेकद्वारे १ लाख रुपये काढले होते व त्यातील ५० हजार रुपये बदलण्यासाठी उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील डॉ. मानिभाई येथे गेले होते. त्यांनी या रकमेतील पन्नास हजार रुपये गाडीमध्ये ठेवले होते. दरम्यान, पतसंस्थेतून नोटा बदलून आले असता त्यांना गाडीची काच फुटलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यांनी गाडीत ठेवलेली रक्कम पाहिली असता ती दिसून आली नाही.
ही घटना समजताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली.