पुणे : पुण्यातील हडपसर परिसरामध्ये जसेजसे येथील भाजीपाला मार्केट, बाजारपेठ, मॉल गजबजू लागले तसतशा येथील वाहन चोऱ्यांमध्येही वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. या वाहनचोरीच्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी हडपसर पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक नेमले असून या तपास पथकामध्ये अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड व पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने यांसह पोलीस अंमलदार कार्यरत आहेत.
हे तपास पथक वाहन चोरी करणाऱ्या आरोपींवर लक्ष केंद्रित करत असताना पोलीस अंमलदार शाहीद शेख व प्रदिप सोनवणे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हडपसर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक अल्पवयीन मुलगा व त्याचे साथीदार हे दुचाकी गाडी चोरी करून सोलापूर हायवेने गाडी घेवून निघून जात असतात. या माहितीच्या आधारे तपास पथक प्रमुख सहा.पोलीस निरीक्षक हनुगंत गायकवाड, पोलीस उप निरीक्षक, सौरभ माने, पोलीस अमलदार प्रदीप सोनवणे, शाहीद शेख, समीर पांडुळे, शशिकांत नाळे, निखील पवार, प्रशांत दुधाळ, प्रशांत टोणपे यांनी तांत्रिक विश्लेषण आधारे एक अल्पवयीन मुलगा व त्याचे सोबत इतर साथीदार हे दुचाकी वाहनांची टेहळणी करीत असताना मिळून आले. त्यांच्या माहीतीच्या आधारे फुरसुंगी सार्वजनिक शौचालयाजवळ सापळा रचून यातील संशयीत इसम हा रोड लगत असणा-या जागेत पार्क केलेल्या गाड्यांची टेहाळणी करीत असताना त्यांना पकडण्यात आले.
यावेळी आरोपींनी आपली नावे 1) युनूस निजाम मुल्ला ( वय 25 वर्ष रा, सध्या गल्ली नं 16, सय्यदनगर हडपसर पुणे मुळगाव मु.पो.चिंचोली ता.उमरगा जिल्हा उस्मानाबाद) 2) हनुमंत शंकर वाकडे (वय 22 वर्ष रा. मु.पो.आलुर ता.उमरगा जिल्हा उस्मानाबाद 3) दिपक ऊर्फ खंडु तातेसाहेब कटकधोंड (वय 24 वर्ष रा. केसर जवळा ता.उमरगा जिल्हा उस्मानाबाद) तसेच एक विधीसंघर्षित बालक हे मिळून आले. संशयीत आरोपी हे ग्रुप बनवून हडपसर, वानवडी, स्वारगेट, फरासखाना या भागातील गर्दीच्या ठिकाणी जावून गाड्यांची टेहाळणी करण्याकरीता विधीसंघर्षित बालकास पुढे पाठवून गाडी पार्क केलेला इसम कोठे जात आहेत हे पहायचे व बनावट चावी आधारे गाडी चोरी करायचे. आरोपींनी आत्तापर्यंत अनेक दुचाकींची चोरी केली असल्याचे कबुल केले असून त्यांच्याकडून आत्तापर्यंत 5 लाखांची 13 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. तपासात आरोपींकडून 10 गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
सदरची कामगिरी ही मा.श्री.नामदेव चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व मा. नम्रता पाटील, पोलीस उपआयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर, यांचे सुचना व मागदर्शनाखाली कल्याणराव विधाते सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, अरविंद गोकुळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन,पुणे शहर, पोनि (गुन्हे) राजु अडागळे, पोनि.(गुन्हे) दिगंबर शिंदे यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उप निरीक्षक सौरभ माने, पोलीस अंमलदार, प्रदीप सोनवणे, गणेश
क्षीरसागर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पांडुळे, शशिकांत नाळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, रियाज शेख, सचिन गोरखे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.