पुणे : दौंड तालुक्यातील वाळू व्यावसायिक संतोष जगताप याचा खून झाल्यानंतर यातील दोघांना पोलिसांनी अटक केली होती. या आरोपींना अटक केल्यानंतर पोलिस तपासात काही नावे पुढे आली. आणि पोलीसांनी त्यांची धरपकड करण्यास सुरुवात केली आहे.
संतोष जगताप याचा खून झाल्यानंतर यात दौंड तालुक्यातील राहू येथील रहिवासी उमेश सोनवणे याचा या कटात सहभाग असल्याचे आणि तो याचा सूत्रधार असल्याचे पुढे आल्याने पोलीसांनी त्यालाही अटक केली. उमेशला न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्याला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
संतोषचा उरुळी येथे गोळीबार करून खून करणारे महादेव आदलिंगे आणि पवन मिसाळ यांनी उमेश हा संतोषच्या खून कटात सहभागी असल्याचे सांगितले तसेच काहीसे उमेश सोनवणे याच्या बाबतीत घडण्याची शक्यता असून उमेश सोनवणे हा एकटाच या कटात सहभागी होत की अजूनही दुसरे कोणी होते याचा पोलीस तपास करीत आहेत. त्यामुळे या खून प्रकरणात आणखीही काही नावे पुढे येण्याची शक्यता वर्तवली असून यात प्रामुख्याने उमेशच्या संपर्कात असणारे काही युवक आणि संतोष जगताप याच्या व्यावसायिक विरोधकांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलीसांनी याबाबत सखोल तपास करून आरोपी निष्पन्न करण्याच्या दृष्टीने धरपकड सुरू केली आहे. त्यामुळे लवकरच यातील अजून काही नावे पुढे येणार असून ते कोण आणि कितीजण आहेत याबाबत लवकरच माहिती समोर येईल.