मुंबई : शाहरुख खान (shahrukh khan) याचा मुलगा आर्यन खान (aryan khan) याच्या ड्रग्ज (drugs) प्रकरणाचा तपास करणारे एनसीबी (NCB) अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhede) हे आता त्यांच्यावर झालेल्या विविध आरोपानंतर चांगलेच गोत्यात आल्याचे दिसत आहे.
त्यामुळे आता समीर वानखेडे (sameer wankhede) यांचीच आता चौकशी होणार असल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलिसांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या चौकशी करण्यासाठी एक टीम स्थापन केली असून मुंबई चे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी याबाबत आदेश काढला आहे.
क्रूझ ड्रग्ज प्रकरणात नवनवीन गोष्टी समोर येत असून त्यामुळे समीर वानखेडेंच्या प्रकरणात आता चौकशी करण्यासाठी विश्वास नांगरे पाटलांची एंट्री झाली आहे. या महिन्यातील 2 ऑक्टोबर रोजी क्रुझ ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. हि कारवाई एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात झाली होती. या कारवाईनंतर मंत्री नवाब मलिक यांनी हि खोटी, बनावट केस असून हाय प्रोफाइल तरुणांना गुंतविण्याच्या उद्देशाने हि प्रीप्लॅन कारवाई करण्यात आल्याचा आरोप केला होता. या नंतर वानखेडेंवर अजूनही वेगवेगळे आरोप होत असतानाच यातील प्रमुख पंच प्रभाकर साईलने मोठा खुलासा करताना 25 कोटींच्या खंडणी वसुलीचे आरोप केले आहेत. त्यामुळे यासर्व प्रकारची चौकशी करण्यासाठी आता नांगरे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली आता चार अधिकाऱ्यांची टीम स्थापन करण्यात आली असून या टीमकडून समीर वानखेडे यांची चौकशी करण्यात येणार आहे.